शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

बलाढ्य निगेलची झुंजार आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 19:30 IST

अव्वल मानांकीत आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या मुंबईच्या निगेल डीह्णसा याने अपेक्षेप्रमाणे पहिल्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.

राज्य बॅडमिंटन : उपांत्यपुर्व फेरीसाठी पुण्याच्या वसिमने झुंजवले

मुंबई : अव्वल मानांकीत आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या मुंबईच्या निगेल डी’सा याने अपेक्षेप्रमाणे पहिल्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. मात्र यासाठी त्याला पुण्याच्या वसिम शेखने तीन गेमपर्यंत झुंजवले. त्याचवेळी अन्य मुंबईकर अब्दुल बारीने देखील आगेकूच केली.महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने स्पोटर््स युनायटेडच्या वतीने चेंबुर जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत निगेलला वसिमकडून कडवी टक्कर मिळाली. पहिला गेम जिंकून आघाडी घेतल्यानंतर निगेलला दुसºया गेममध्ये वसिमने नमवले. यानंतर तिसºया निर्णायक गेममध्ये दमदार खेळ करताना निगेलने १५-१०, १०-१५, १५-१० अशी बाजी मारुन आगेकूच केली. अब्दुलने सहज आगेकूच करताना मुंबईच्याच अमित क्षत्रियचे आव्हान १५-१४, १५-१० असे संपुष्टात आणले. दुसरीकडे पुणेकर अभिषेक कुलकर्णीने सहजपणे उपांत्यपुर्व फेरी गाठताना सांगलीच्या श्रीपाद परदेशीचा १५-१०, १५-१३ असा पराभव केला. अनुभव विप्लव कुवळेनेही मुंबईच्याच हर्ष जगधानेचा १५-१०, १५-१२ असा पाडाव करुन दिमाखात उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. ठाण्याच्या अक्षय राऊतने मुंबईच्या अनीश नायरचा १५-६, १५-७ असा धुव्वा उडवला.नागपूरच्या गौरव रेगेने दणदणीत विजय मिळवताना नाशिकच्या हृषिकेश झाडेचा १५-३, १५-९ असा फडशा पाडला. तर मुंबईच्या रोहित मोरेला नाशिकच्या विनायक दंडवतेविरुद्ध ११-१५, १०-१५ अशा निराशाजनक पराभवासह गाशा गुंडाळावा लागला. (क्रीडा प्रतिनिधी)दुहेरी निकाल :अभिषेक कुलकर्णी / निशाद द्रविड वि.वि. लोकेश सोनावणे / वसिम शेख १५-६, १५-९; अक्षय राऊत / प्रसाद शेट्टी वि.वि. मोहित कनानी / शैलेश पाटील १५-४, १५-७; एशान नाक्वी / वरुण खानवलकर वि.वि. श्रेयश कृष्णमुर्ती / वरद गोवंडे १५-१०, १५-१२; सचिन भारती / विलास कुवळे वि.वि. मनिष हडकर / संदीप मोहन १५-१२, १५-११.