शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मानांकन कॅरम : मोहम्मद आणि ऐशा यांनी पटकावले जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 21:39 IST

मोहम्मदने मुंबईच्याच रियाझ अकबर अलीला १५-१४, २३-२२ असे सरळ दोन सेटमध्ये नमवले.

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले येथे झालेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या मोहम्मद घुफ्रान आणि ऐशा खोकावाला यांनी पुरुष आणि महिला एकेरी गटाचे जेतेपद पटकावले.

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मोहम्मदने मुंबईच्याच रियाझ अकबर अलीला १५-१४, २३-२२ असे सरळ दोन सेटमध्ये नमवले. अंतिम सामना हा चांगलाच रंगतदार झाला. कारण दोन्ही सेटमध्ये मोहम्मदला रियाझने कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपला अनुभव पणाला लावला. पण पहिल्या सेटमध्ये अखेर मोहम्मदने बाजी मारली. दुसरा सेटही यावेळी चांगला चुरशीचा झाला. दुसऱ्या सेटमध्येही मोहम्मदने रियाझवर फक्त एका गुणाच्या फरकाने मात करत जेतेपदाला गवसणी घातली.

तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत मुंबईच्या अग्रमानांकित प्रशांत मोरेने संदीप देवरुखकरला १८-१२, २३-१४ अशी धूळ चारली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत मोहम्मदने प्रशांतवर ११-२०, २२-५, १७-९ असा, तर रियाझने संदीपवर २५-५, १६-२२, २५-४ असा विजय मिळवला.

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत अनुभवी ऐशाने रत्नागिरीच्या किशोरवयीन आकांक्षा कदमचा २३-१५, ७-२०, २५-१७ असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. त्यामुळे सलग दुसरी राज्य मानांकन स्पर्धा जिंकण्याचे आकांक्षाचे स्वप्न भंगले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत मुंबईच्या काजल कुमारीने वैभवी शेवाळेचा २५-६, २५-८ असा धुव्वा उडवला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य लढतींमध्ये ऐशाने काजलवर ६-२३, २५-१४, २१-७ अशी, तर आकांक्षाने वैभवीवर १५-२०, २०-१६, २५-१७ अशी मात करून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.

टॅग्स :Mumbaiमुंबई