शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुंबई उपनगरचे ऐतिहासिक जेतेपद, महिलांमध्ये ठाणेकरांनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:30 IST

मुंबई उपनगर संघाने राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावताना पुरुष गटात पहिल्यांदाच बाजी मारली.

मुंबई : मुंबई उपनगर संघाने राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावताना पुरुष गटात पहिल्यांदाच बाजी मारली. त्याचवेळी, महिलांमध्ये ठाणे संघाने वर्चस्व राखले. मुंबई उपनगरने चमकदार कामगिरी करताना तगड्या पुणे संघाला, तर ठाण्याने रत्नागिरीला पराभूत करत बाजी मारली.महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने वरळी स्पोटर््स क्लबच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या पुरुष अंतिम संघात मुंबई उपनगरने बलाढ्य पुण्याचा १४-१३ असा २० सेकंद व १ गुणाने थरारक पाडाव केला. ॠषिकेश मुर्चावडे आणि अनिकेत पोटे यांनी अप्रतिम अष्टपैलू खेळ करताना उपनगरचा विजय साकारला. त्याचप्रमाणे, अक्षय भांगरे, हर्षद हातणकर व सागर घाग यांनी शानदार बचाव करत पुणेकरांना घाम गाळायला लावले. पुण्याकडून प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, अक्षय गणपुले आणि वैभव पाटील यांनी अपयशी झुंज दिली.महिलांमध्ये गतविजेत्या ठाण्याने आपले जेतेपद कायम राखताना रत्नागिरीचे आव्हान ७-५ (३-३, ४-२) असे परतावले. पहिल्या सत्रात बरोबरी राहिल्यानंतर, दुसºया सत्रात आक्रमक पवित्रा घेतलेल्या ठाण्याने दोन गुणांची आघाडी निर्णायक ठरवली.प्रीयांका भोपी, कविता घाणेकर यांनी अष्टपैलू खेळी करत ठाण्याचे जेतेपद कायम राखण्यात मोलाचे योगदान दिले. तसेच प्रणाली मगरचे संरक्षण आणि दीक्षा सोनसूरकरचे आक्रमणही महत्त्वाचे ठरले. रत्नागिरीकडून ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार व आरती कांबळे यांनी छाप पाडली.स्पर्धेतील वैयक्तिक विजेतेसर्वोत्कृष्ट खेळाडूपुरुष : ॠषिकेश मुर्चावडे (मुं. उपनगर)महिला : प्रीयांका भोपी (ठाणे)सर्वोत्कृष्ट संरक्षकपुरुष : अक्षय भांगरे (मुं. उपनगर)महिला : ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी)सर्वोत्कृष्ट आक्रमकपुरुष : प्रतीकवाईकर (पुणे)महिला : प्रणालीमगर (ठाणे)

टॅग्स :Sportsक्रीडाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र