औरंगाबादला रंगणार राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा
By admin | Updated: June 21, 2014 00:15 IST
औरंगाबाद : जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे औरंगाबाद येथे २७ ते २९ जूनदरम्यान विभागीय क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय कुमार, कुमारी तलवारबाजी स्पर्धा होणार आहे.
औरंगाबादला रंगणार राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा
औरंगाबाद : जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे औरंगाबाद येथे २७ ते २९ जूनदरम्यान विभागीय क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय कुमार, कुमारी तलवारबाजी स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळपास ३00 ते ४00 खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेदरम्यान राज्य संघटनेतर्फे देण्यात येणार्या पुरस्कारांचे वितरण शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते होणार आहे. सदस्य नामदेव शिरगावकर, प्रोझोनचे संचालक अनिल इरावने, जितेंद्र दहाडे, भारतीय तलवारबाजी महासंघाचे अशोक दुधारे, राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काटोळे, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, सचिव उदय डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षपदी मंजुदेवी खंडेलवाल यांची नियुक्ती करणार आहे. कार्याध्यक्ष म्हणून उदय डोंगरे, आयोजन समिती सदस्य म्हणून दिनेश वंजारे व स्वागताध्यक्ष म्हणून फकीरराव घोडे पाटील असतील. सत्कारमूर्ती : जीवनगौरव : लिनताताई कडव (नागपूर), उत्कृष्ट प्रशिक्षक : आनंद वाघमारे (मुंबई), उत्कृष्ट पंच : राजू श्िंादे (नाशिक), वरिष्ठ खेळाडू : स्वप्नील तांगडे (औरंगाबाद), मुली : निशा पुजारी (ठाणे), कनिष्ठ खेळाडू : जय खंडेलवाल (मुंबई), मुली : शरयू पाटील (नाशिक), शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त : अशोक दुधारे, चंद्रजित जाधव, आनंद खरे, यू. डी. इंगळे, दिलीप घोडके, स्नेहा ढेपे, अजिंक्य दुधारे, स्नेहल विधाते. (क्रीडा प्रतिनिधी)