राज्य खो खो स्पर्धेत मुंबई उपनगर, ठाणे अजिंक्य
By admin | Updated: October 1, 2014 00:05 IST
नशिक : महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या वतीने आयोजित ४२ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबई उपनगर, तर मुलींच्या गटात ठाणेच्या संघाने अजिंक्यपद पटकावले.
राज्य खो खो स्पर्धेत मुंबई उपनगर, ठाणे अजिंक्य
नशिक : महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या वतीने आयोजित ४२ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबई उपनगर, तर मुलींच्या गटात ठाणेच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. शहरातील विभागीय क्रीडा संकुल येथे गेल्या चार दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. अखेरच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे मुंबई व मुंबई उपनगर संघामध्ये अंतिम सामना रंगला. मुंबई उपनगर संघाने मुंबईवर २१-१५ अशा गुण फरकाने मात करत विजेते पदाची हॅट्ट्रिक नोंदवली.मुलींच्या गटात अंतिम सामना अहमदनगर विरुद्ध ठाणे असा रंगला. या सामन्यात ठाणे संघाने अहमदनगर संघाचा १२-९ असा पराभव करून विजेतेपद पटकावले, तर अहमदनगर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील विशेष खेळाडूंना उपमहापौर गुरुमित बग्गा, उद्योजक हेमंत राठी, सुरेश भटेवरा, वि. वि. करमरकर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अष्टपैलू खेळाडू- अशितोष शिंदे (मुंबई), शीतल भोर (ठाणे), उत्कृष्ट संरक्षक- दुर्वेश साळुंके (मुंबई उपनगर), प्रियंका भोपी (ठाणे), उत्कृष्ट आक्रमक- संदेश महाडिक (मुंबई उपनगर), मयुरी भुत्याल (अहमदनगर) यांचा सामावेश आहे़यावेळी व्यासपीठावर राज्य खो खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख, खजिनदार तुषार सुर्वे, सचिव सचिन गोडबोले, जिल्हा संघटनेचे कमलाकर कोळी, रमेश भोसले, अविनाश खैरनार, उमेश आठवणे उपस्थित होते.फोटो क्रमांक - 29 पीएचएसपी64 - राज्य खो खो स्पर्धेत मुलांच्या गटातील विजेतेपदाचे पारितोषिक स्वीकारताना मुंबई उपनगरचा संघ़ 29पीएचएसपी65 - राज्य खो खो स्पर्धेत मुलींच्या गटातील विजेतेपदाचे पारितोषिकस्वीकारताना ठाणेचा संघ़