शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

व्हाीएचए शालेय हॉकी सुरू

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

व्हीएचएची शालेय हॉकी स्पर्धा सुरू

व्हीएचएची शालेय हॉकी स्पर्धा सुरू
स्वामीनारायण स्कूलचा
रेल्वे जनमंडलवर एकतर्फी विजय
नागपूर : हर्ष पटेल आणि प्रणय कुथे यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलमुळे स्वामीनारायण स्कूलने बुधवारपासून विदर्भ हॉकी संघटनेच्या मैदानावर सुरू झालेल्या आंतर शालेय हॉकी स्पर्धेच्या सलामी लढतीत रेल्वे जनमंडल स्कूलचा ६-१ ने सहज पराभव केला.
सामन्यात खाते उघडले ते रेल्वे जनमंडलने. या संघाकडून सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर रौनक चौधरी याने गोल नोंदवित आघाडी मिळवून दिली होती. पण हर्ष पटेल याने स्वामीनारायणसाठी झटपट दोन गोल नोंदविले. नवव्या मिनिटाला त्याने पहिला आणि ११ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. विशाल सगनानी आणि सत्यम सहोडिया यांनी अनुक्रमे १५ आणि २१ व्या मिनिटांना गोल नोंदवित आघाडी ४-१ अशी केली. प्रणय कुथे याने २५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत पाचवा तसेच ३९ व्या मिनिटाला पुन्हा एकदा धडक देत स्वत:चा दुसरा आणि संंघाचा सहावा गोल नोंदविला.
त्याआधी माजी गोलकिपर सुभाष चंदर यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी व्हीएचए अध्यक्ष राधेशाम सारडा हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सचिव विनोद त्रिवेदी, कोषाध्यक्ष श्याम शर्मा, सहसचिव प्रमोदजैन,सलिम बेग, नंदू आकोजवार, कुणाल पाटील, गुरुमूर्ती पिल्ले, संजय लोखंडे, रामपाल ठाकूर, सुनील मदने, रवी सिरपतवार, शीतलसिंग, जागेश्वर कैथवास, अशोक सक्करगाये, जावेद राणा, आदींची उपस्थित होती.
धर्मेंद्र कनोजिया यांनी संचालन केले. पाकमध्ये झालेल्या दहशतवादी कृत्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकांना यावेळी खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली.
सुभाष चंदर यांनी यावेळी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला ११०० रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली.
उद्या गुरुवारी सेंट जॉन्स हायस्कूलविरुद्ध आरबीजीजी हा सामना सकाळी ९ वाजेपासून, एसएफएसविरुद्ध जाईबाई चौधरी हायस्कूल हा सामना १० पासून जिंगलबेल्सविरुद्ध रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल हा सामना ११ वाजेपासून खेळविण्यात येईल.(क्रीडा प्रतिनिधी)