शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

‘हेरगिरी’ प्रकरणात अडकले श्रीनिवासन

By admin | Updated: November 21, 2015 04:38 IST

भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असताना विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी एका ब्रिटिश कंपनीची सेवा घेत सहा कोटी रुपये खर्च केल्याप्रकरणी माजी अध्यक्ष एन

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असताना विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी एका ब्रिटिश कंपनीची सेवा घेत सहा कोटी रुपये खर्च केल्याप्रकरणी माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन अडचणीत आले आहेत. बोर्डाचे नवे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखालील नव्या कार्यकारिणीने श्रीनिवासन आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले असून चौकशी समितीदेखील नेमली.मुंबईत गुरुवारी बोर्डाची तातडीची बैठक झाली. या बैठकीत तिन्ही जणांना नोटीस बजावण्यात आली. वृत्तानुसार २०१३-१४ या कालावधीत ब्रिटनमधील सुरक्षा आणि तपास कामाशी संबंधित पेज प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस कंपनीला (पीपीएस) बोर्डातील श्रीनिवासन विरोधकांच्या हालचाली टिपण्यासाठी हेरगिरी करण्यास नियुक्त केले होते. बोर्डाने निर्धारित कालावधीत आपली सेवा घेतल्याची कबुली स्वत: पीपीएसने दिली आहे. या मुद्यावर ९ नोव्हेंबरच्या आमसभेतही चर्चा झाली. प्रकरणाचा तपास करण्यासाठी अजय शिर्के आणि जी. गंगाराजू या दोन सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. शिर्के आणि गंगाराजू यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासंदर्भात माजी सचिव संजय पटेल आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांची भेट घेतली. हे दोघेही श्रीनिवासन यांचे विश्वासू मानले जायचे. आयपीएलच्या सहाव्या पर्वातील भ्रष्टाचारप्रकरणी श्रीनिवसान सत्ताच्युत होताच पटेल आणि चौधरी यांनादेखील पद गमवावे लागले होते. पटेल यांनी ब्रिटिश कंपनीला रक्कम देण्याची परवानगी दिली तर चौधरी यांनी ही रक्कम बहाल केली होती.बोर्डाच्या आमसभेने श्रीनिवासन यांना नुकतेच आयसीसी चेअरमन पदावरून देखील पायउतार व्हायला भाग पाडले. त्यांच्या जागी बोर्डाचे अध्यक्ष आणि श्रीनिवासन यांचे कट्टर विरोधक मनोहर यांची चेअरमनपदी वर्णी लागली. उर्वरित कार्यकाळ मनोहर सांभाळणार आहेत. बोर्डाची दुसऱ्यांदा जबाबदारी सांभाळणारे मनोहर हे भ्रष्टाचार नष्ट करण्यावर भर देत असून लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यादृष्टीने बोर्डात पदाधिकाऱ्यांची दुहेरी भूमिका असू नये असे त्यांचे ठाम मत आहे. २००६ च्या आयपीएलमध्ये भ्रष्टाचार तसेच स्पॉट फिक्सिंग उघड झाले. यात श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन दोषी आढळताच श्रीनि यांच्यावर अध्यक्षपद सोडण्यासाठी दडपण आले. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पदाधिकाऱ्यांची बोर्डातील दुहेरी भूमिका आणि चौकशीत अडथळे येऊ नये यासाठी शिवलाल यादव यांना बोर्डाचे अंतरिम अध्यक्ष नेमले होते. तपास होईस्तोवर श्रीनिवासन यांनी पदापासून अलिप्त रहावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. (वृत्तसंस्था)संजय पटेल यांनी केला इन्कारया प्रकरणाचा बीसीसीआयचे माजी सचिव संजय पटेल यांनी मात्र इन्कार केला आहे. ते म्हणाले, पेज प्रोटेक्शन सर्व्हिस या ब्रिटीश कंपनीने आपल्या सचिवपदाच्या काळात कोणतीही हेरगिरी केलेली नाही.ते म्हणाले, मी ज्या दिवशी पद सोडले त्याच दिवशी बीसीसीआयचा अधिकृत इमेल बंद केला होता. मी कोणाचीही हेरगिरी करण्याचे आदेश दिलेले नाहीत. मला याविषयी ज्यावेळी विचारणा होईल. त्यावेळी मी त्यांना याचे उत्तर देईन. या कंपनीची सेवा का घेण्यात आली होती असे विचारले असता पटेल म्हणाले, एकदा बीसीसीआयचा इमेल हॅक करण्यात आला होता. पुन्हा अशी घटना घडू नये आणि ट्विटरसह महत्त्वपूर्ण ई डाक्युमेंटस सुरक्षित रहावेत यासाठी या कंपनीची सेवा घेण्यात आली होती, परंतु यासाठी कंपनीवर हेरगिरीचा आरोप करणे चुकीचे आहे.