शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

श्रीलंकेचा विंडीजला व्हाईटवॉश

By admin | Updated: October 26, 2015 23:05 IST

फिरकीपटू रंगाना हेराथ आणि मिलिंदा सिरिवर्धना यांच्या अचूक माऱ्यापुढे विंडीजचा संघ सोमवारी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला

कोलंबो : फिरकीपटू रंगाना हेराथ आणि मिलिंदा सिरिवर्धना यांच्या अचूक माऱ्यापुढे विंडीजचा संघ सोमवारी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. श्रीलंकेने दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी विजय मिळवित मालिकेत विंडीजला व्हाईटवॉश दिला. विंडीजपुढे श्रीलंकेत पहिला कसोटी विजय मिळविण्यासाठी २४४ धावांचे लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २० धावांची मजल मारली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवशी खेळ झाला नाही. आज स्वच्छ सूर्यप्रकाशात श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले आणि विंडीजचा डाव १७१ धावांत गुंडाळला. फिरकीपटू हेराथने ५६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. अष्टपैलू सिरीवर्धनाने त्याला योग्य साथ देताना २५ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. कमी धावसंख्येच्या या लढतीत सिरीवर्धनाने फलंदाजीमध्येही छाप उमटवली. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. हेराथने दोन सामन्यांत १५ बळी घेतले. हेराथ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. वेस्ट इंडिजतर्फे ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक ६१ धावा फटकावल्या, तर शाई होपने ३५ धावांची खेळी केली. या दोघांनी सकाळी १५ षटके संयमी फलंदाजी करीत धावसंख्या ८० पर्यंत पोहोचवली. या दोघांच्या भागीदारीमुळे विंडीज संघाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, पण त्यानंतर श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजने ५८ धावांच्या मोबदल्यात ८ बळी गमावले. होप बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. सिरीवर्धनाच्या गोलंदाजीवर त्याला यष्टिरक्षक कुशल परेराने यष्टिचित केले. त्यानंतर विंडीज संघाच्या घसरगुंडीला प्रारंभ झाला. मरलॉन सॅम्युअल्स (६) आणि जेरमी ब्लॅकवूड (४) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर हेराथने दिनेश रामदिन (१०) आणि ब्राव्हो यांना एकाच षटकात माघारी परतवत श्रीलंका संघाचा विजय निश्चित केला. ब्राव्होने १३४ चेंडूंना सामोरे जाताना ३ चौकार व २ षटकार ठोकले. कर्णधार जेसन होल्डर (७), जेरोम टेलर (१) आणि देवेंद्र बिशू (०) बाद झाल्यामुळे विंडीजची ९ बाद १३८ अशी अवस्था झाली. त्यानंतर जोमेल वारिकन (नाबाद २०) आणि केमार रोच (१३) यांनी अखेरच्या विकेटसाठी ३३ धावांची केलेली भागीदारी केवळ पराभवातील अंतर कमी करणारी ठरली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकश्रीलंका पहिला डाव : २००. वेस्ट इंडिज पहिला डाव : सर्व बाद १६३. श्रीलंका दुसरा डाव : सर्व बाद २०६. वेस्ट इंडिज दुसरा डाव : सर्व बाद १७१.