शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेला ‘विराटवॉश’

By admin | Updated: November 17, 2014 01:46 IST

नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचे सिध्द करीत विराट कोहलीने आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला.

रांची : नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचे सिध्द करीत विराट कोहलीने आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारताने ५-0 अशी जिंकली. रविवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी व ८ चेंडू राखून पराभव केला. कर्णधार विराट कोहलीच्या (नाबाद १३९ धावा, १२६ चेंडू, १२ चौकार, ३ षट्कार) शतकी खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला. श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची (नाबाद १३९) शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. भारताने श्रीलंकेचा डाव ८ बाद २८६ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४८.४ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. भारताच्या विजयात विराट कोहलीसह अंबाती रायडू (५९ धावा, ८ चौकार, १ षट्कार) याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मेंडिसने चार बळी घेत रंगत निर्माण केली होती; पण कोहलीने संयमी फलंदाजी करीत भारताचा विजय निश्चित केला.त्याआधी कर्णधार मॅथ्यूजच्या वन-डे क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने ८ बाद २८६ धावांची आव्हानात्मक मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या श्रीलंकेची एकवेळ १८.३ षटकांत ४ बाद ८५ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मॅथ्यूजने डाव सावरताना श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. मॅथ्यूजने ११६ चेंडूंना सामोरे जाताना १० षट्कार व ६ चौकारांच्या साहाय्याने नाबाद १३९ धावा फटकाविल्या. मॅथ्यूजने थिरिमानेसोबत पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. थिरिमानने ७६ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व १ षट्काराच्या साहाय्याने ५२ धावा फटकाविल्या. मॅथ्यूजने कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरला षट्कार लगावीत ७८ चेंडूंमध्ये वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. मॅथ्यूजने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मॅथ्यूजने दुसरे अर्धशतक केवळ २६ चेंडूंमध्ये पूर्ण केले. यापूर्वी वन-डे क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम खेळी ९२ धावांची होती. ही खेळी त्याने पाकविरुद्ध साकारली होती. धवल कुलकर्णीने अखेरच्या षटकात केवळ ४ धावा दिल्यामुळे लंकेला ३०० धावांचा पल्ला ओलांडण्यात अपयश आले. कुलकर्णीने ५७ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतविले. सलामीवीर तिलकरत्ने दिलशानने २४ चेंडूंमध्ये ३५ धावा फटकाविल्या. श्रीलंकेने पहिल्या ४.४ षटकांत ३२ धावा वसूल केल्या. कुलकर्णीच्या पहिल्या षटकात दिलशानने ३ चौकार ठोकत आपला निर्धार जाहीर केला. वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या निरोशन डिकवेलाची (४) कामगिरी निराशाजनक झाली. त्याला कुलकर्णीने माघारी परतविले. कुलकर्णी सुरुवातीला महागडा ठरला; पण दुसऱ्या टोकाकडून बिन्नीने अचूक मारा केला. बिन्नीने दिलशानचा अडथळा दूर केला, तर दिनेश चांदीमलला (५) अक्षर पटेलने तंबूचा मार्ग दाखविला. जयवर्धनेला (३२) मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याला अश्विनने स्लिपमध्ये तैनात अजिंक्य रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले. (वृत्तसंस्था)