शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
2
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
3
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
5
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
6
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
7
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
8
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
9
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
10
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
11
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
12
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
13
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
14
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
15
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
16
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
17
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
18
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
19
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम

श्रीलंकेचा विजय ‘तिलक’

By admin | Updated: March 18, 2016 03:43 IST

तिलकरत्ने दिलशानच्या ५६ चेंडंूत ८३ धावांच्या जोरावर श्रीलंकेने अफगाणिस्तानला ६ गडी राखून हरवीत टी-२० विश्वकप स्पर्धेत गुरुवारी अभियानाला विजयी प्रारंभ केला. अनुभवाच्या

कोलकाता : तिलकरत्ने दिलशानच्या ५६ चेंडंूत ८३ धावांच्या जोरावर श्रीलंकेने अफगाणिस्तानला ६ गडी राखून हरवीत टी-२० विश्वकप स्पर्धेत गुरुवारी अभियानाला विजयी प्रारंभ केला. अनुभवाच्या अभावामुळे बळी घेण्यात आलेले अपयश आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे दीडशेच्यावर आव्हान उभारूनही अफगाणिस्तान या सामन्यात पराभूत झाला. दिलशानला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.प्रथम फलंदाजी करताना असगर स्टॅनिकजाईची (६२ धावा, ४७ चेंडू, ४ षट्कार, ३ चौकार) अर्धशतकी खेळी व त्याने शेनवरीसोबत (३१ धावा, १४ चेंडू) पाचव्या विकेटसाठी ५.३ षटकांत केलेल्या ६१ धावांच्या उपयुक्त भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध ७ बाद १५३ धावांची आव्हानात्मक मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने सावध सुरुवात केली. सलामीवीर दिनेश चांदिमलच्या रूपाने त्यांनी पहिला बळी गमावाला, पण दुसरा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान मात्र आज विजयी पताका फडकवायचीच असा निर्धार करून आला होता. त्याने धोकादायक फटक्यांचा मोह टाळत आपली खेळी सजवत नेली. ३७ चेंडूंत त्याने आपले अर्धशतक साजरे केले, तर १५ व्या षटकांत संघाचे शतक फलकावर लागले. शेवटच्या काही षटकांत आवश्यक धावगती प्रतिषटके ९ पर्यंत गेली असता कर्णधार मॅथ्यूजने झंझावाती १0 चेंडूंत २१ धावा केल्याने श्रीलंकेचा विजय सुकर झाला. या दबावाच्या वेळी अफगाणी क्षेत्ररक्षकांनी हातातले चेंडू सोडून चौकारांची शिदोरी वाटल्याने लंकेचे काम सोपे झाले. १८.५ षटकांत १५५ धावा करून श्रीलंका विजयी झाली.तत्पूर्वी, कोलकातातील ईडन गार्डन मैदानावर नाणेफेक जिंंकून अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. मोहम्मद शहजाद (८) झटपट माघारी परतला. त्यानंतर नूर अली जरदान (२०) व स्टॅनेकजाई यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. जरदान बाद झाल्यानंतर कलीम सादिक (०) व मोहम्मद नबी (३) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर समीउल्ला शेनवरी व स्टॅनिकजाई यांनी आक्रमक अर्धशतकी भागीदारी नोंदवत संघाला धावसंख्येचे शतक ओलांडून दिले. नजीबउल्ला जरदानने ३ चेंडूत आक्रमक १२ धावांची खेळी करीत संघाला दीडशेचा पल्ला ओलांडून दिला. धावफलकअफगाणिस्तान - मोहंमद शहजाद झे. चामिरा गो. मॅथ्यूज ८, नूर अली जरदान गो. हेराथ २०, असगर स्टॅनिकजाई झे. चांदीमल, गो. परेरा ६२, करीम सादीक झे. चांदीमल, गो. परेरा ०, मोहंमद नबी पायचित गो. हेराथ ३, समिउल्लाह शेनवारी झे. परेरा, गो. कुलशेखरा ३१, शफिकुल्लाह थिरिमाने गो. परेरा ५, जरदान नाबाद ५, नजीबुल्लाह जरदान नाबाद १२. इतर - ७, एकूण : २० षटकांत ७ बाद १५३ (१८.५) गोलंदाजी : मॅथ्यूज ३-०-१७-०१, कुलशेखरा ४-०-४३-१, चामिरा ४-०-१९-०, हेराथ ४-०-२४-२, परेरा ४-०-३३-३, सिरीवर्धने १-०-१६-०.श्रीलंका : चांदीमल झे. शेनवरी गो. नबी १८, दिलशान नाबाद ८३, थिरीमाने गो. रशिद खान ६, परेरा धावचित मो. शेहजाद १२, कापुगेदरा धावचित नबी १०, मॅथ्यूज नाबाद २१. इतर - ५ एकूण : १८.५ षटकांत ४ बाद १५५. गोलंदाजी : करीम सादीक २-०-२१-०, हमीद हसन ३.५-०-३८-०, दवलत जरदान ३-०-३१-०, मो. नबी ४-१-२५-१, रशीद खान ४-०-२७-१, समीउल्लाह शेनवरी २-०-९-० .