शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

श्रीसंत, अंकित, चंदिला यांच्या भविष्याचा निर्णय २५ जुलै रोजी

By admin | Updated: June 30, 2015 02:11 IST

दिल्लीतील एक न्यायालयाने आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंत, अंकित चव्हाण

नवी दिल्ली : दिल्लीतील एक न्यायालयाने आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंदिला यांच्यावरील आरोप निश्चित करण्याबाबतच्या सुनावणीला आगामी २५ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. पतियाळा हाऊस कोर्टामध्ये या प्रकरणाची आज सकाळी सुनावणी झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांनी पुढील सुनावणीसाठी २५ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. सुनावणीदरम्यान श्रीसंत उपस्थित होता. न्यायाधीशांनी म्हटले, की या प्रकरणाचे निकालपत्र अद्याप तयार झालेले नसल्यामुळे सुनावणी व आरोप निश्चित करण्यासाठी स्थगिती देण्यात येत आहे. आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंग करण्याच्या आरोपाखाली मे २०१३मध्ये अटक केली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनी या तीन क्रिकेटपटूंविरुद्ध तांत्रिक आधारावर न्यायालयात अद्याप आरोप निश्चित होऊ शकले नाहीत. न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीसंत म्हणाला, ‘‘माननीय न्यायाधीशांनी २५ जुलैला पुढील तारीख निश्चित केली आहे. निर्णय आल्यानंतर मला न्याय मिळेल, अशी आशा आहे.’’भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सप्टेंबर २०१३मध्ये श्रीसंत व चव्हाण यांच्यावर आजीवन बंदी घातली, तर चंदिलाचे प्रकरण बोर्डाच्या शिस्तपालन समितीकडे अद्याप प्रलंबित आहे. पतियाळा हाऊस कोर्टाच्या बाहेर आज सकाळपासून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. त्यांत श्रीसंतचे गृहराज्य केरळच्या टीव्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींची गर्दी अधिक होती. श्रीसंत न्यायालयाबाहेर पडला त्या वेळी शांत दिसत होता. तो म्हणाला, ‘‘सुनावणी आता जवळजवळ महिनाभरानंतर होणार आहे. त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजू की कमनशिबी, हे कळत नाही. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून मला नक्की न्याय मिळेल, अशी आशा आहे. या प्रकरणाला आता जवळजवळ दोन वर्षे झाली असून, मी क्रिकेटला ‘मिस’ करीत आहे. पुढील सुनावणीदरम्यान निर्णय होईल आणि मला सामान्य जीवन जगता येईल, अशी आशा आहे.’’श्रीसंत व चव्हाण यांना या प्रकरणात १० जून २०१३ रोजी जामीन मिळाला, तर चंदिलाने आणखी तीन महिने तुरुंगात घालविले. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर श्रीसंत विवाहबंधनात अडकला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश नीना बन्सल कृष्ण यांनी गेल्या २३ मे रोजी या प्रकरणात आरोप निश्चित करण्यासाठी २९ जूनची तारीख दिली होती आणि आरोपींच्या वकिलांना ६ जूनपर्यंत लेखी युक्तिवाद देण्यास सांगितले होते. या प्रकरणात या तीन क्रिकेटपटूंव्यतिरिक्त अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचा सहकारी छोटा शकील यांच्यावरही आरोप आहेत. दिल्ली पोलीस विभागाच्या विशेष शाखेने आरोपपत्रात ४२ जणांना आरोपी केले होते. त्यांत ६ फरारी आरोपींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)