शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

श्रीजा शेषाद्रीचे जबरदस्त पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 04:58 IST

भारताची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री हिने जबरदस्त पुनरागमन करताना महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या नवव्या फेरीत विजयी कामगिरी केली.

मुंबई : भारताची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री हिने जबरदस्त पुनरागमन करताना महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या नवव्या फेरीत विजयी कामगिरी केली. बेल्जियमच्या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर अ‍ॅना झोझुलिया हिला पराभवाचा धक्का देत श्रीजाने ५ गुणांसह सातव्या स्थानी झेप घेतली.अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या (एआयसीएफ) मान्यतेने आणि इंडियन चेस स्कूल व साऊथ मुंबई चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने चेंबूर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत श्रीजाने चौथ्या, पाचव्या व सहाव्या असे सलग तीन विजय नोंदवत जबरदस्त आगेकूच केली होती.मात्र यानंतर सातव्या व आठव्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने स्पर्धा क्रमवारीत ती मागे पडली. त्यामुळे महत्त्वपूर्ण बनलेल्या नवव्या फेरीतील लढतीत श्रीजाला विजय आवश्यक बनला होता आणि तिने अपेक्षित कामगिरी करताना शानदार विजय मिळवत आगेकूच केली.श्रीजाने याआधी महिला आय.एम. वंतिका अग्रवाल (भारत), महिला आय. एम. आकांक्षा हगवणे (भारत) आणि महिला फिडे मास्टर दिव्या देशमुख (भारत) यांना पराभूत केले होते. अन्य लढतीत आकांक्षाने आपल्याच देशाच्या दिव्या देशमुखचा पराभव करत व्हिएतनामच्या महिला ग्रँडमास्टर थि किम फुंग वो हिच्यासह प्रत्येकी ५.५ गुणांची कमाई करत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.