शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

साथीदाराचा चेंडू सानियाच्या कोर्टात

By admin | Updated: September 15, 2015 23:54 IST

जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थानावर असलेली महिला टेनिसपटू सानिया मिर्झा पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतातर्फे

नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थानावर असलेली महिला टेनिसपटू सानिया मिर्झा पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतातर्फे दुहेरीतील सहकारी म्हणून कुणाची निवड करेल, याबाबत चर्चा सुरू झालेली आहे. दुहेरीतील सहकारी म्हणून मी किंवा पेस यापैकी कुणाची निवड करायची याचा अधिकार केवळ सानियाकडे आहे, असे मत दुहेरीतील दिग्गज खेळाडू रोहन बोपन्नाने व्यक्त केले. जागतिक क्रमवारीत दुहेरीत १३ व्या स्थानावर असलेला रोहन बोपन्ना रिओ आॅलिम्पिकसाठी मिश्र दुहेरीबाबतच्या चर्चेला उत्तर देताना म्हणाला, ‘आॅलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत सानिया कुणासोबत खेळणार, हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही. जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार सानियाचा आहे. मी किंवा पेस यांच्यापैकी ती कुणाची निवड करते, हे स्पष्ट होईलच.’बोपन्ना वर्षातील अखेरच्या ग्रॅण्डस्लॅम यूएस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत तर मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत पराभूत झाला तर पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरीत पेसचे यंदाच्या मोसमातील हे तिसरे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. सानियानेही हिंगीसच्या साथीने महिला दुहेरीत जेतेपद पटकावले. विम्बल्डननंतर सानियाचे हे सलग दुसरे गॅ्रण्डस्लॅम विजेतेपद आहे. रिओ आॅलिम्पिकसाठी सानियाला पेस किंवा बोपन्ना यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. सानिया या दोन्ही खेळाडूंसोबत मिश्र दुहेरीमध्ये यापूर्वीही खेळलेली आहे. बोपन्ना म्हणाला,‘मी आणि पेस दोघेही सानियासोबत खेळण्यास उत्सुक आहोत, पण सानिया कुणाच्या साथीने खेळण्यास इच्छुक आहे, याला अधिक महत्त्व आहे. ती दुहेरीमध्ये अव्वल क्रमांकाची खेळाडू आहे. जोडीदाराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सानियाचा आहे.’पुरुष दुहेरीबाबत बोलताना बोपन्ना म्हणाला,‘आॅलिम्पिकमध्ये ६० ते ६५ पर्यंत संयुक्त मानांकन असलेले खेळाडू सहभागी होतात. सध्या आपल्याकडे मी व पेसशिवाय दुसरा पर्याय नाही.’ बोपन्नाने लंडन आॅलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत पेसच्या साथीने खेळण्यास नकार दिला होता, हे येथे उल्लेखनीय.ज्यावेळी मी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सहभागी होतो त्यावेळी माझ्यात आत्मविश्वास असतो. फ्लोरिन मेर्जियाच्या साथीने माझी कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे, असेही बोपन्नाने एका उत्तरात स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)मी अनेक जोडीदार बदलले, पण दुहेरीमध्ये जोडीदार बदलणे लाभदायक ठरत नाही. ताळमेळ साधण्यासाठी अडचण भासते. मेर्जियासोबत माझा ताळमेळ चांगला आहे. आमच्याकडे विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत चांगली संधी होती. आम्ही पाचव्या सेटमध्ये विजया समीप पोहोचल्यानंतर पराभूत झालो. जर अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरलो असतो तर जेतेपद पटकावता आले असते. आम्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरत आहोत. आम्हाला लवकरच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावण्यात यश मिळेल.- रोहन बोपन्ना