क्रीडा पानासाठी : ब्रिलियंट चेक ॲकॅडमीची संस्कृती वानखडे आशिया युथ चेस चॅम्पियन आफ्रिकेतील वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपसाठी जाणार
By admin | Updated: July 1, 2014 22:08 IST
अकोला : उझबेकिस्थान येथील ताश्कंदमध्ये २० ते २९ जूनपर्यंत झालेल्या आशियाई युथ चेस चॅम्पियनशिपमध्ये ८ वर्षांखालील गटात अकोल्याच्या ब्रिलियंट चेस ॲकॅडमीची स्टार खेळाडू संस्कृती संघदास वानखडे हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचा बहुमान पटकविला. तिला डब्ल्यू.एफ.एम. वुमन फिडे मास्टर हा किताब मिळाला असल्याचे ॲकॅडमीचे जितेंद्र अग्रवाल यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
क्रीडा पानासाठी : ब्रिलियंट चेक ॲकॅडमीची संस्कृती वानखडे आशिया युथ चेस चॅम्पियन आफ्रिकेतील वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपसाठी जाणार
अकोला : उझबेकिस्थान येथील ताश्कंदमध्ये २० ते २९ जूनपर्यंत झालेल्या आशियाई युथ चेस चॅम्पियनशिपमध्ये ८ वर्षांखालील गटात अकोल्याच्या ब्रिलियंट चेस ॲकॅडमीची स्टार खेळाडू संस्कृती संघदास वानखडे हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचा बहुमान पटकविला. तिला डब्ल्यू.एफ.एम. वुमन फिडे मास्टर हा किताब मिळाला असल्याचे ॲकॅडमीचे जितेंद्र अग्रवाल यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. संस्कृतीने अतिशय अल्पवयात सलग चार वर्ष आशियाई स्पर्धा जिंकली आहे. तिचा हा विक्रम आहे. संस्कृतीने वयाच्या अडीच वर्षापासून बुद्धिबळाचे धडे गिरविणे सुरू केले आहे. तिने आतापर्यंत ५० ट्रॉफी व २० मेडल जिंकले आहेत. दिल्ली येथे आशिया चॅम्पियन स्पर्धेत संस्कृतीने सांघिक गटात गोल्ड मेडल जिंकले आहे. ६ वर्षाआतील युथ चेस चॅम्पियनशिप श्रीलंका येथे संस्कृतीने ब्लिटस, रॅपीट, क्लासिक तीनही प्रकारात भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले होते. विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणार्या संस्कृतीने ताश्कंदमध्ये आशिया युथ चेस चॅम्पियनचा किताब पटकावला. संस्कृती आता दक्षिण आफिक्रेतील डर्बन येथे आयोजित वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपसाठी जाणार आहे. यासाठी तिने कसून सराव सुरू केला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी अकोला महापालिकेचे आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते संस्कृतीचा सत्कार करण्यात आला. पत्रकार परिषदेला संस्कृती वानखडे, प्रभजितसिंग बछेर, रश्मी अग्रवाल, संघदास वानखडे उपस्थित होते.