क्रीडा : मेरिकोम
By admin | Updated: September 2, 2014 19:36 IST
आशियाई स्पर्धेत गोल्डन पंच लगावणार-मेरिकोम
क्रीडा : मेरिकोम
आशियाई स्पर्धेत गोल्डन पंच लगावणार-मेरिकोम गुडगाव : इंचियोन येथे होणार्या आशियाई स्पर्धेसह आगामी रिओ ऑलिम्पिकमध्येही गोल्डन पंच लगावणार असा विश्वास भारताची अनुभवी बॉक्सर मेरिकोम हिने व्यक्त केला आहे़ या स्पर्धांसाठी विशेष मेहनत घेत असल्याचेही तिने म्हटले आहे़ मेरिकोम म्हणाली, मी आगामी आशियाई स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे़ मी ग्वाग्झूं येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही कास्यपदक मिळविले होते़ आता आशियाई स्पर्धेत सुवर्ण मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे़ त्यात नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास आहे़ त्याचबरोबर २०१६ मधील ऑलिम्पिकमध्येही गोल्डवर नाव कोरण्याचा इरादा असल्याचे तिने म्हटले आहे़ ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता मिळविता आली नव्हती़ त्यामुळे टीकाकारांनी माझ्यावर टीका केली होती़ मेरिकोमचे करिअर आता संपले असल्याचेही त्यांनी म्हटले होते़ मात्र मी आताच थांबणार्यांपैकी नाही़ आगामी आशियाई आणि ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून टीकाकारांना उत्तर द्यायचे आहे़ (वृत्तसंस्था)