क्रीडा लोकल क्रिकेट
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
इलेव्हन स्टार विजयी
क्रीडा लोकल क्रिकेट
इलेव्हन स्टार विजयीनागपूर : डीआरएम चॅलेंज कप आमंत्रित संघाच्या स्पर्धेत गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत इलेव्हन स्टारने मध्य रेल्वे संयुक्त इलेव्हनचा ९ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना संयुक्त इलेव्हनने २० षटकांत ११६ धावांची मजल मारली. अर्जुन सामंतरेने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. भूषण वहाणे (२५) आणि नितीन अहिरराव (२०) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. इलेव्हन स्टारतर्फे चंद्रकांत बानकर आणि अपूर्व वानखेडे यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात खेळताना इलेव्हन स्टार संघाने विजयासाठी आवश्यक धावा केवळ १० षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. इलेव्हन स्टारच्या विजयात संकेत सुभेदार (४४), वैभव चांदेकर (नाबाद ३६) आणि अपूर्व वानखेडे (नाबाद ३०) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. (क्रीडा प्रतिनिधी)