शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
5
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
6
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
7
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
8
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
9
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
10
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
11
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
12
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
13
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
14
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
15
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
16
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
17
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
18
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
19
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
20
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!

खेळांचा गेम - अनधिकृत संघटनांनी मांडलाय खेळांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 03:33 IST

सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह देशभरात अनधिकृत संघटनांनी खेळांचा बाजार मांडला असून, त्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे.

नवनाथ खराडेअहमदनगर : सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह देशभरात अनधिकृत संघटनांनी खेळांचा बाजार मांडला असून, त्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. काही वर्षांपूर्वी खेळांची संख्या वाढविल्यामुळे आपोआपच संघटनांची संख्याही वाढली; मात्र अधिकृत व अनधिकृत संघटना कोणती, याबाबत खेळाडू व पालक अनभिज्ञ असल्याने स्पर्धांच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविले म्हणून सध्या अनेक खेळाडूंची नावे वाचायला मिळतात. मात्र, यात मोठा भूलभुलैया सुरू आहे. शालेय स्पर्धांचे आयोजन शासनाच्या क्रीडा विभागाकडून केले जाते. याव्यतिरिक्त इतर स्पर्धांचे आयोजन त्या-त्या खेळांच्या संघटना करतात. मात्र, या संघटना अधिकृत असतील, तरच त्या खेळाडूंना सवलतीचा लाभ मिळतो. सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत संघटनांनी खेळांचा बाजार मांडलेला आहे. या संघटनांचा आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय खेल महासंघ, भारतीय आॅलिम्पिक महासंघ, राज्य आॅलिम्पिक संघांशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही.वरील संघांशी संलग्न नसलेल्या अनेक संघटना महाराष्ट्र व देशभर कार्यरत आहेत. त्या वेळोवेळी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करीत असतात. त्यासाठी ते मान्यता असल्याचे सांगत मार्केटिंग करतात. सरकारी सवलती मिळत असल्याचेही सांगण्यात येते. शिष्यवृत्ती, रोख पुरस्कारही मिळणार असल्याचा प्रचार केला जातो. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी या अनधिकृत संघटना खेळाडंूकडून मोठ्या प्रमाणात शुल्क म्हणून पैसा जमा करतात. एकाच जिल्ह्यातून अनेक संघांची निवड करून व्यावसायिकता साधली जाते.अधिकृत संघटनाकशी ओळखावी?खेळाची जिल्हा संघटना राज्य संघटनेशी संलग्न असावी. राज्य संघटना ही राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असावी, तसेच या संघटनेस राज्य आॅलिम्पिक असोसिएशनची मान्यता हवी. राष्ट्रीय संघटनेला इंडियन आॅलिम्पिक असोसिएशनची मान्यता हवी. अशी साखळी नसलेली संघटना अनधिकृत म्हणून ओळखली जाते.

टॅग्स :Sportsक्रीडाStudentविद्यार्थी