शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा प्रबोधिनी उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 02:53 IST

अखिल भारतीय हॉकी : १६ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत एसएनबीपी, मध्य प्रदेश, जय भारत संघही अंतिम आठमध्ये

पुणे : तिसऱ्या १६ वर्षांखालील मुलांच्या अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत पुण्याची क्रीडा प्रबोधिनी, आयोजक एसएनबीपी अकादमी यांच्यासह मध्य प्रदेश हॉकी असोसिएशन आणि हरियाणाच्या जय भारत हॉकी या संघांनी गुरुवारी आपापल्या गटांतून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अ‍ॅस्ट्रो टर्फ मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. ड गटाच्या सामन्यात क्रीडा प्रबोधिनीने हॉकी कुर्ग संघाचा ११-० असा धुव्वा उडविला. विजयी संघाकडून अक्षय शेंडे याने ४ गोल, आदित्य लालगे व धैर्यशील जाधव यांनी प्रत्येकी दोन गोल, तर अशोक उरगुडे, मुस्ताफा शेख व प्रथमेश हजारे यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला. क गटाच्या सामन्यात हरियाणातील जय भारत हॉकी संघाने मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन संघाचा ५-१ असा सहज पराभव करून आगेकूच केली. ब गटाच्या सामन्यात मध्य प्रदेश हॉकी असोसिएशन संघाने गुमान हेरा रायझर्स संघाचा ३-१ असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. अब्दुल अहाड, प्रियो बात्रा व शैलेंद्र सिंग यांनी गोलपूर्ण कामगिरी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. पूर्वार्धात दोन्ही संघ १-१ने बरोबरीत होते. रायझर्सतर्फे एकमेव गोल साहिलकुमार याने केला.पहिल्या ३ मिनिटांतच शादाबची हॅट्ट्रिकअ गटाच्या सामन्यात आयोजक एसएनबीपी अकादमीने हॉकी धुळे संघाचा १३-० असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. एसएनबीपीच्या शादाब मोहम्मद याने हॅट्ट्रिकसह ३ गोल केले. पहिल्या ३ मिनिटांतच ३ गोल डागत शादाबने प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरवली. याशिवाय नरेश चाटोळे याने तीन, अभिषेक माने याने दोन, तर प्रतीक सोळंकी, नागेश वाघमारे, अजय गोटे, ऋषीकेश मांडाळे व अभिषेक खालगे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले. पूर्वार्धातच ९-० अशी मोठी आघाडी घेत एसएनबीपीने आपला विजय निश्चित केला होता.निकाल : जय भारत हॉकी, भिवानी, हरियाणा : ५ (अग्यापाल २, हरीष ज्युनिअर १, भरत कौशिक १, गोविंद १) वि. वि. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन : १ (हृतिक गुप्ता).क्रीडा प्रबोधिनी : ११ (अक्षय शेंडे ४, आदित्य लालगे २, अशोक उरगुडे १, मुस्ताफा शेख १, धैर्यशील जाधव २, प्रथमेश हजारे १) वि. वि. हॉकीकुर्ग : ०.एसएनबीपी अकादमी : १३ (शादाब मोहम्मद ३, नरेश चाटोळे ३, अभिषेक माने २, प्रतीक सोळंकी १, नागेश वाघमारे १, अजय गोटे १, ऋषीकेश मांडाळे १, अभिषेक खालगे १) वि. वि. हॉकी धुळे : ०.मध्य प्रदेश हॉकी असोसिएशन :३ (अब्दुल अहाड १, प्रियो बात्रा १, शैलेंद्र सिंग १) वि. वि. गुमान हेरा रायझर्स : १ (साहील कुमार).मध्य प्रदेश हॉकी अकादमी,भोपाळ : ९ (प्रियो बात्रा २, शैलेंद्र सिंग २, मुदासार कुरेशी २, सादम अहमद १, अली अहमद १, डिंकू शर्मा १) वि. वि. कोहिनूर अकादमी : ०.स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ गुजरात :१ (गौरांग अंबूलकर) वि. वि. हॉकी शिंदेवाही : ०.

टॅग्स :Puneपुणे