शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

स्पोर्ट: होलीक्रॉस कॉन्व्हेंट व कारमेल स्कूल विजयी जिल्हा स्तर शालेय क्रिकेट स्पर्धा

By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST

अकोला: महानगरपालिका क्षेत्र जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्यफेरीतील सामने गुरुवारी पार पडले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना उद्या शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी होलीक्रॉस कॉन्व्हेंट व माऊंट कारमेल इंग्लिश स्कूल संघात होणार आहे. आज झालेल्या उपान्त्यफेरीतील सामन्यात गुरूनानक विद्यालय व कोठारी कॉन्व्हेंटला पराभव स्वीकारावा लागला.

अकोला: महानगरपालिका क्षेत्र जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्यफेरीतील सामने गुरुवारी पार पडले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना उद्या शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी होलीक्रॉस कॉन्व्हेंट व माऊंट कारमेल इंग्लिश स्कूल संघात होणार आहे. आज झालेल्या उपान्त्यफेरीतील सामन्यात गुरूनानक विद्यालय व कोठारी कॉन्व्हेंटला पराभव स्वीकारावा लागला.
पहिल्या उपान्त्य सामना होलीक्रॉस व गुरूनानक विद्यालयात झाला. होलीक्रॉसने प्रथम फलंदाजी करीत गुरूनानक विद्यालयासमोर ३३ धावांचे लक्ष्य ठेवले. मयंक व पीयूष सावरकर यांनी अनुक्रमे १० व ११ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात गुरुनानक संघाचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. होलीक्रॉसच्या पीयूष सावरकर याने २ व आनंद इंगळे आणि ऋषी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसरा उपान्त्य सामना कारमेल स्कूल व कोठारी कॉन्व्हेंट संघात खेळला गेला. कारमेलने प्रथम फलंदाजी करीत ५१ धावांचे लक्ष्य कोठारी संघासमोर ठेवले. कारमेलचा अष्टपैलू खेळाडू आकाश राऊत याने नाबाद १६ तर संकेत डिक्कर याने नाबाद ९ धावा काढल्या. अजलान राजा याने ८ तर सिद्धार्थ दहातोंडे याने ६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात कोठारी कॉन्व्हेंट ३४ धावा काढून गारद झाला. देव राठी याने १८ आणि हर्षल याने ८ धावांचे योगदान दिले. कारमेलच्या आकाश राऊत, सिद्धार्थ दहातोंडे, शिवम, मंदार अलोणे, संकेत डिक्कर यांनी सुंदर गोलंदाजी करीत संघाची अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली. (क्रीडा प्रतिनिधी)
बॉक्स
आकाश राऊत नाबाद
माऊंट कारमेल स्कूलचा सलामीचा फलंदाज आकाश राऊत याने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यात नाबाद खेळी केली. प्रत्येक सामन्याचा विजयी शिल्पकार ठरत संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला. आकाशने बाल शिवाजी संघाविरुद्ध नाबाद २६, राजेश्वर कॉन्व्हेंट विरुद्ध नाबाद १६, आजच्या उपान्त्यफेरीतदेखील कोठारी कॉन्व्हेंट विद्ध नाबाद १६ धावा ठोकल्या.
...