स्पोर्ट: अमरावती मनपा विजयी विभागीय सेपक टॅकरा क्रीडा स्पर्धा
By admin | Updated: September 26, 2014 21:41 IST
अकोला: जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने व अकोला जिल्हा सेपक टॅकरा असोसिएशन यांच्या सहकार्याने अमरावती विभागीय शालेय सेपक टॅकरा क्रीडा स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगण येथे २५ सप्टेंबर रोजी केले होते. १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात झालेल्या स्पर्धेत दोन्ही गटात अमरावती महानगरपालिका संघाने विजेतेपद पटकाविले.
स्पोर्ट: अमरावती मनपा विजयी विभागीय सेपक टॅकरा क्रीडा स्पर्धा
अकोला: जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने व अकोला जिल्हा सेपक टॅकरा असोसिएशन यांच्या सहकार्याने अमरावती विभागीय शालेय सेपक टॅकरा क्रीडा स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगण येथे २५ सप्टेंबर रोजी केले होते. १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात झालेल्या स्पर्धेत दोन्ही गटात अमरावती महानगरपालिका संघाने विजेतेपद पटकाविले.मुलांच्या गटात झालेल्या पहिल्या उपान्त्य सामन्यात अमरावती जिल्हा संघाने अकोला महानगरपालिका संघाचा ११-१५, १५-१०, १५-४ असा पराभव केला. दुसर्या उपान्त्य सामन्यात अमरावती महानगरपालिका संघाने अकोला जिल्हा संघावर १६-१४, १५-८ असा विजय मिळविला. अंतिम सामन्यात अमरावती महानगरपालिकेने अमरावती जिल्हा संघाचा १६-१४,१५-१३ असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात पहिला उपान्त्य सामना अमरावती जिल्हा व अकोला जिल्हा संघात होऊन हा सामना अमरावती जिल्हा संघाने १५-८,१५-५ असा जिंकला. दुसरा उपान्त्य सामन्यात अमरावती महानगरपालिका संघाला प्रतिस्पर्धी नसल्याने संघाला विजयी घोषित करण्यात आले. अंतिम सामना अमरावती महानगरपालिका व अमरावती जिल्हा संघात झाला. हा सामना अमरावती महानगरपालिका संघाने १५-५,१५-५ असा जिंकला. स्पर्धेत पंच म्हणून रोशन सिंग नागपूर, समीरूद्दीन शेख नागपूर, तारेश आगाशे अकोला यांनी काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी)....