स्पोर्ट: राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला ४१ पदके
By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST
अकोला: चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अकोलाच्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत ४१ पदकांसह राज्यात प्रथम स्थान पटकाविले. यामध्ये १९ सुवर्णपदके, ४ रौप्यपदके व १८ कांस्यपदकांचा समावेश आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पोर्ट: राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला ४१ पदके
अकोला: चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अकोलाच्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत ४१ पदकांसह राज्यात प्रथम स्थान पटकाविले. यामध्ये १९ सुवर्णपदके, ४ रौप्यपदके व १८ कांस्यपदकांचा समावेश आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले होते. अमरावती विभाग व अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या ६५ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी ४१ खेळाडूंना पदकांची कमाई करता आली. अकोल्याचा हरिवंश टावरी याला १९ वर्षाआतील गटात बेस्ट बॉक्सरचा पुरस्कार मिळाला. रोहण पटेकर, नाना पिसाळ व जिब्रान खान यांना बेस्ट प्रोमोसिंग बॉक्सरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरुष गटात क्रीडापीठ अकोला संघ राज्यात अव्वल स्थानी राहिली.दिया बचे, पूनम कैथवास, सायली रोठे, कोमल गायकवाड, भुरा जानीवाला, नाना पिसाळ, जिब्रान खान, सचिन चव्हाण, राहिल सिद्धिकी, ऋषिकेश फंदाट, अजय आसेरी, विक्रम भ, विक्की जांगडे, अनंता चोपडे, रोहण पटेकर, हरिवंश टावरी, अभय सोनोने, समर्थ पाटील यांनी सुवर्णपदक पटकाविले. संग्राम भोसले, विनोद दाभाडे, सय्यद साद, मो. शहाबुद्दीन यांनी रौप्यपदक मिळविले. गौरी जयसिंगपुरे, साक्षी गायधनी, दिव्यानी जंजाळ, शेख रेहान, विकी आवळे, सय्यद अनिस, सौरभ देशमुख, अजय पेंदोर, चेतन चव्हाण, कैलास जाधव, क्षितिज तिवारी, प्रज्वल डोंगरे, अब्दुल अजहर, वैभव लांबोरे, शेख मजहर, सुदर्शन येनकर यांनी कांस्यपदक प्राप्त केले. सर्व बॉक्सर राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ, प्रशिक्षक पुरुषोत्तम बावणे, डॉ. शाकीर पठाण, नीळकंठ देशमुख, राहुल वानखडे, संदीप सिंग यांच्या मार्गदर्शनात वसंत देसाई क्रीडांगण येथील जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण घेत आहेत.(क्रीडा प्रतिनिधी)फोटो कॅप्शन: राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेतील विजेते-३०सीटीसीएल३९...