शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय

By admin | Updated: November 16, 2016 00:12 IST

दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा एक डाव व ८० धावांनी पराभव करीत आॅस्ट्रेलियात सलग तिसऱ्यांदा मालिका विजय साकारला.

होबार्ट : दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा एक डाव व ८० धावांनी पराभव करीत आॅस्ट्रेलियात सलग तिसऱ्यांदा मालिका विजय साकारला. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी उपाहारापूर्वी आॅस्ट्रेलियाचा डाव १६१ धावांत गुंडाळत सहज विजय नोंदवला. आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ ८५ धावांत संपुष्टात आला होता. आज आॅस्ट्रेलियाने अखेरच्या ८ विकेट ११६ चेंडूंमध्ये ३२ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. पर्थमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात १७७ धावांनी विजय मिळवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने १९८० ते १९९० च्या दशकातील विंडीज संघासोबत बरोबरी साधली. विंडीजने त्या वेळी आॅस्ट्रेलियात सलग तीन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. आॅस्ट्रेलियाचा हा कसोटी सामन्यातील सलग पाचवा पराभव ठरला. यापूर्वी आॅगस्टमध्ये आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेत सलग तीन कसोटी सामने गमावले होते. आजच्या पराभवामुळे प्रशिक्षक डॅरेन लेहमन व कर्णधार स्टिव्हन स्मिथ यांच्यावरील दडपण वाढले आहे. आॅस्ट्रेलियाचे फलंदाज पुन्हा एकदा काएल एबोट (६-७७) आणि कागिसो रबाडा (४-३४) यांच्या माऱ्याविरुद्ध सपशेल अपयशी ठरले. २ बाद १२१ धावसंख्येवरून आॅस्ट्रेलियाने पुढे खेळण्यास सुरुवात केली. चौथ्या दिवशीच्या सुरुवातीच्या २० मिनिटांच्या खेळामध्ये आॅस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाची (६४) विकेट गमावली. त्यानंतर त्यांचा डाव गडगडला. एबोटच्या गोलंदाजीवर कटचा फटका मारण्याच्या प्रयत्नात ख्वाजा यष्टिरक्षक क्विंटन डिकाककडे झेल देत माघारी परतला. त्याने स्मिथच्या साथीने ५० धावांची भागीदारी केली. फॉर्मात नसलेला अ‍ॅडम व्होजेस (२) एबोटच्या गोलंदाजीवर गलीमध्ये तैनात जेपी ड्युमिनीकडे झेल देत माघारी परतला. कॅलम फर्ग्युसन केवळ एक धाव काढून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. रबाडाने त्यानंतर यष्टिरक्षक पीटर नेव्हिल (६) व जो मनी (०) यांना तंबूचा मार्ग दाखवला. स्मिथला (३१) रबाडाने यष्टिरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. एबोटने त्यानंतर मिशेल स्टार्क (००) आणि नॅथन लियोन (४) यांना बाद करीत दक्षिण आफ्रिकेला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. (वृत्तसंस्था)