शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

द. आफ्रिका २४८ धावांत गारद

By admin | Updated: July 21, 2015 23:40 IST

गेल्या महिन्यात पहिल्या वन-डे लढतीत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने पदार्पणाच्या कसोटी

चटगाव : गेल्या महिन्यात पहिल्या वन-डे लढतीत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात आज चार चेंडूंच्या अंतरात तीन बळी घेण्याची कामगिरी केली. मुस्तफिजुरच्या अचूक माऱ्याच्या जोरावर बांगलादेशने आजपासून प्रारंभ झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २४८ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशने दिवसअखेर दोन षटकांच्या खेळात बिनबाद ७ धावा केल्या. आजचा खेळ थांबला त्या वेळी तमीम इक्बाल (१) आणि इमरुल कायेस (५) खेळपट्टीवर होते. मुस्तफिजुरने ३७ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने कर्णधार हाशिम अमला (१३), जेपी ड्युमिनी व क्विंटन डिकाक यांना चार चेंडूंच्या अंतरात माघारी परतवत दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीला धक्का दिला. लेग स्पिनर जुबेर हुसेनने ५३ धावांत ३ बळी घेत त्याला योग्य साथ दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला चांगल्या व आक्रमक सुरुवातीचा लाभ घेता आला नाही. त्यांनी अखेरच्या ९ विकेट केवळ ११२ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. कारकिर्दीतील तिसरा कसोटी सामना खेळणाऱ्या तेम्बा बावुमाने दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक ५४ धावा केल्या. डीन एल्गर (४७) व स्टियान वान जिल (३४) यांनी सलामीला ५८ धावांची भागीदारी करीत दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली. एल्गरने त्यानंतर फॅफ ड्युप्लेसिसच्या (४८) साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी दक्षिण आफ्रिकेने १ बाद १०४ अशी मजल मारली होती.धावफलकदक्षिण आफ्रिका पहिला डाव : डीन एल्गर झे. दास गो. इस्लाम ४७, वान झिल झे. दास गो. महमुदुल्ला ३४, फॅफ ड्यूप्लेसिस पायचीत गो. शाकिब ४८, हाशिम अमला झे. दास गो. रहमान १३, टेम्बा बावुमा झे. हुसेन गो. रहमान ५४, जीन पॉल ड्युमिनी पायचीत गो. रहमान ००, क्विंटन डिकाक त्रि. गो. रहमान ००, वेर्नोन फिलँडर झे. शाकिब गो. हुसेन २४, सिमोन हार्मेर झे. मोमिनुल गो. हुसेन ०९, डेल स्टेन झे. तमीम गो. हुसेन ०२. अवांतर (१४). एकूण ८३.४ षटकांत सर्व बाद २४८. बाद क्रम : १-५८, २-१३६, ३-१३६, ४-१७३, ५-१७३, ६-१७३, ७-२०८, ८-२३७, ९-२३९, १०-२४८. गोलंदाजी : मोहम्मद शाहिद १७-९-३४-०, मुस्तफिजुर रहमान १७.४-६-३७-४, शाकिब अल-हसन १४-२-४५-१, महमुदुल्ला ३-०-९-१, ताजिउल इस्लाम १८-३-५७-१, जुबेर हुसेन १४-१-५३-३. बांगलादेश पहिला डाव :- तमीम इक्बाल खेळत आहे ०१, इमरुल कायेस खेळत आहे ०५. अवांतर (१), एकूण २ षटकांत बिनबाद ७. गोलंदाजी : डेल स्टेन १-०-६-०, वेर्नोन फिलँडर १-०-१-०.