शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

कुछ तो करना पडेगा!, आईच्या शब्दांनी केले प्रेरीत- लवलिना बोरगोहेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 06:15 IST

Lovlina Borgohain: ऑलिम्पिक यशाच्यानिमित्ताने लवलिनाने ‘लोकमत’शी साधलेला विशेष संवाद...

- रोहित नाईक

मुंबई : बहिणींचा किक बॉक्सिंग खेळ पाहून खेळाकडे वळालेल्या लवलिना बोरगोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करताना भारताला बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवून दिले. अशी कामगिरी करणारी लवलिका ही विजेंदर सिंग आणि मेरी कोम यांच्यानंतरची केवळ तिसरी भारतीय ठरली. या यशाचे श्रेय लवलिनाने आपल्या आईला दिले असून ती नेहमी, काहीतरी करुन दाखवायचे आहे, असे सांगत आम्हाला प्रेरीत करायची, असे लवलिनाने म्हटले. ऑलिम्पिक यशाच्यानिमित्ताने लवलिनाने ‘लोकमत’शी साधलेला विशेष संवाद...

पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना पदक जिंकली, काय सांगशील?हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मी माझ्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचे लक्ष्य बाळगले होते. अखेरच्या लढतीपर्यंत मी स्वत:ला अजून आपण पदक जिंकले नसल्याचे सांगत होती. मी कांस्य जिंकले असले, तरी मला माझे सुवर्ण पदकाचे स्वप्न पूर्ण करायचे असून पॅरिस आॅलिम्पिकमध्ये मी हे स्वप्न नक्की पूर्ण करेन. सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत देशाचे नाव उंचावण्यात यश मिळाले, याचा आनंद आहे. एकूणच हा अविस्मरणीय अनुभव ठरला.

कांस्य पदकाच्या लढतीदरम्यान काय विचार सुरु होते?यावेळी मी भावनिक झाले होते. पराभव हा पर्याय होऊ शकत नाही, असे मी स्वत:ला सांगितले. मी प्रतिस्पर्धी बॉक्सरविरुद्ध चारवेळा पराभूत झाले होते, पण मी कोणत्याही भीतीविना खेळले आणि यावेळी माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते, पण सर्वकाही मिळवायचे होते. मी स्वत:वर विश्वास ठेवला आणि कांस्य मिळवले.

मेरीकोमच्या कामगिरीशी बरोबरी केल्यानंतर कसे वाटते?हा अनुभव शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आम्ही सर्वजण मेरीकोमला पाहून लहाणाचे मोठे झालो. माझ्यासह अनेक बॉक्सर्सना मेरीने प्ररीत केले आहे आणि आताही करत आहे. २०१२ साली मी मेरीकोमला ऑलिम्पिक पदक जिंकताना पाहिले आणि आता अशी कामगिरी करणारी मी तिच्यानंतरची दुसरी भारतीय महिला बॉक्सर ठरली. हा खूप मोठा सन्मान आहे. पण आता मला अजून खूप यश मिळवायचे आहे आणि ही केवळ सुरुवात आहे.

खेळासाठी घरून कशा प्रकारे पाठिंबा मिळाला?अनेक अडचणी असतानाही माझ्या पालकांनी कधीही मला आणि माझ्या दोन्ही बहिणींना खेळापासून दूर जाऊ दिले नाही. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवताना, कायम पाठिंबा दिला. त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहचू शकले. माझी आई आम्हा तिघी बहिणींना कायम सांगायची की, काहीतरी करुन दाखवावे लागेल. आईचे हे शब्द कायम प्रेरणादायी ठरले आणि आज ऑलिम्पिक पदक मिळवल्याचा आनंद आहे. मला आतापर्यंत पाठिंबा दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार.

मुलींना काय संदेश देशील?मुलींना सांगेन की, स्वत:वर आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. सर्वकाही तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. फक्त मेहनतीची तयारी ठेवा.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021