शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

...म्हणून धोनीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा?

By admin | Updated: January 5, 2017 10:17 IST

क्रीडा समीक्षकांच्या मते, स्पर्धात्मक क्रिकेटपासून बराच काळ दूर राहिल्यामुळे धोनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. संघातील सदस्य म्हणून खेळणार असला तरी धोनीचा पुढील प्रवास

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटला अलविदा करणाऱ्या धोनीने वन डे तसेच टी-20मध्ये भारताला शिखरावर पोहोचवले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तर, 2015 च्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरी गाठली होती. धोनीने बुधवारी रात्री तडकाफडकी भारतीय वन डे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत पुन्हा एकदा चकित केलं असले तरी स्वत: धोनीने यासंदर्भात अजूनपर्यंत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे धोनीच्या या राजीनाम्याचे कारण अद्यापदी गुलदस्त्यातच आहे. मात्र,  क्रीडा समीक्षकांनी यावर आपला अंदाज वर्तवला आहे. 
 
क्रीडा समीक्षकांच्या मते, स्पर्धात्मक क्रिकेटपासून खूप वेळ दूर राहिल्यामुळे धोनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. संघातील सदस्य म्हणून खेळणार असला तरी धोनीचा पुढील प्रवास आगामी वर्षात होणाऱ्या इंग्लडमधील चॅम्पियन ट्रॉफीनंतरच ठरेल. काही समीक्षकांच्या मते गेल्या दोन वर्षात झालेल्या मालिकांमध्ये आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता न आल्यामुळे धोनी दबावामध्ये आला होता. त्यामुळे टीकेचा आणखी भडिमार होण्यापेक्षा अगोदरच विराटच्या हाती सूत्रे देऊन बाजूला होण्याचा धोनीचा विचार असावा. याशिवाय, वयोमानाप्रमाणे कारकीर्दीला लागलेली उतरती कळा पाहून धोनीने जबाबदाऱ्या बाजूला सारून आपल्या वैयक्तिक खेळावर लक्ष केंद्रित करायचे ठरविले असण्याची शक्यताही क्रीडा वर्तुळात व्यक्त करत आहेत.
 

कूल कप्तानीचे पर्व संपले!

 
दुसरीकडे असे म्हटले जाते की,  धोनीने भारतीय संघाच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला असावा. 2019 मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी नविन कर्णधाराला तयारीसाठी वाव मिळावा म्हणून धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा होत आहे. आगामी विश्वचषकासाठी अद्याप दोन वर्षाचा कालावधी बाकी आहे. विराट कोहलीची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी पाहता नवा कर्णधार म्हणूनही विराटची नियुक्ती होऊ शकते. तसे झाल्यास त्याला आयसीसी विश्वचषकाच्या तयारीसाठी दोन वर्षाचा कालावधी मिळू शकतो. 
 
2019 चा विश्वचषक खेळणार धोनी
क्रीडा समीक्षकांच्या मते, धोनीची 2019 मध्ये होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याची इच्छा आहे, त्यासाठी स्वतला फिट ठेवण गरजेचं आहे. त्यामुळेचं त्याने राजीनामा देण पसंत केलं. यापुर्वी 2014 मध्ये कसोटी कर्णधार म्हणून आलेल्या अपयशानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
 
विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली खेळणार धोनी
15 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या वनडे आणि टी 20 मालिकेत धोनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली खेळणार आहे. विराटला धोनीकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. कोहली त्याचा पुरेपुर फायदा घेत भारताला नव्या उंचीपर्यंत पोहचवण्यात यशस्वी होईल. 
 
धोनीचा वनडे आणि टी-20 कर्णधार म्हणून प्रवास - 
महेंद्रसिंग धोनी याने 199 वन-डे आणि 72 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. 199 वनडे मध्ये भारताने 110 सामन्यात विजय मिळवला तर 74 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. 15 सामने मात्र अनिर्णित राहिले. तर 72 टी-20 सामन्यांपैकी भारताने 41 सामन्यांत विजय तर 28 सामन्यात पराभव पत्करावा लागला. २०११ साली धोनीने भारताला ५० षटकांचा, वन-डे आयसीसी विश्वचषक मिळवून दिला. तसेच २०१३ साली भारताने धोनीच्या नेतृत्वामध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली.