शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

स्मिथ-व्होग्सची चमक

By admin | Updated: November 17, 2015 03:08 IST

कर्णधार स्टिव्हन स्मिथ (नाबाद १३१) आणि अ‍ॅडम व्होग्स (नाबाद १०१) यांनी झळकावलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात

पर्थ : कर्णधार स्टिव्हन स्मिथ (नाबाद १३१) आणि अ‍ॅडम व्होग्स (नाबाद १०१) यांनी झळकावलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सोमवारी चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात १९३ धावांची आघाडी घेतली. रॉस टेलरला (२९०) त्रिशतक झळकावण्यात अपयश आले; पण त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात ६२४ धावांची दमदार मजल मारली. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने दिवसअखेर दुसऱ्या डावात ६३ षटकांत २ बाद २५८ धावांची मजल मारली. आॅस्ट्रेलियाकडे एकूण १९३ धावांची आघाडी असून, त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार स्मिथने १७० चेंडूंना सामोरे जाताना १७ चौकारांच्या मदतीने नाबाद १३१ धावा फटकावल्या, तर व्होग्सने १८० चेंडूंना सामोेरे जाताना १५ चौकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या आहेत. त्याआधी, न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर त्रिशतकी खेळी करण्यात अपयशी ठरला. उपाहारापूर्वी न्यूझीलंडचा डाव ६२४ धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडला पहिल्या डावात ६५ धावांची आघाडी मिळाली. ३१ वर्षीय टेलरने आपल्या विक्रमी खेळीत ३७४ चेंडूंना सामोरे जाताना ४३ चौकार ठोकले. त्याने या खेळीत एकही षटकार मारला नाही. टेलर आॅस्ट्रेलियात विदेशी संघातर्फे सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज ठरला आहे. टेलरने १११ वर्षे जुना विक्रम मोडला आणि न्यूझीलंडला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आॅस्ट्रेलियातर्फे कर्णधार स्मिथ व व्होग्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी २१२ धावांची अभेद्य भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाला चौथ्या दिवसअखेर वर्चस्व मिळवून दिले. (वृत्तसंस्था)274* धावांची स्टीफन फ्लेमिंगने पी. सारा ओव्हल मैदानावर केलेली खेळी ही न्यूझीलंडकडून परकिय भूमीवर झालेली सर्वोच्च खेळी होती. न्यूझीलंडकडून परदेशात केवळ चौघांनीच २५0 च्या पुढे धावा केल्या आहेत. 364 धावांची खेळी करणारे इंग्लंडचे लेन हुटन हे आॅस्ट्रेलियाविरुध्दचे एकमेव त्रिशतकवीर आहेत. १९३८ मध्ये ओव्हलवर त्यांनी ही खेळी केली होती. टेलरच्या २९0 धावा आॅस्ट्रेलियाविरुध्द दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या बनली आहे.धावफलकआॅस्टे्रलिया (पहिला डाव) : १३३ षटकांत ९ बाद ५५० धावा घोषित.न्यूझीलंड (पहिला डाव) : १५३.५ षटकांत सर्वबाद ६२४ धावा.आॅस्टे्रलिया (दुसरा डाव) : जो बर्न्स झे. टेलर गो. साऊदी ०, डेव्हीड वॉर्नर झे. लॅथम गो. बोल्ट २४, स्टीव्हन स्मिथ खेळत आहे १३१, अ‍ॅडम व्होग्स खेळत आहे १०१. अवांतर - २. एकूण : ६३ षटकांत २ बाद २५८ धावा. गोलंदाजी : टिम साऊदी १३-३-४०-१; टे्रंट बोल्ट १०-०-५०-१; डग ब्रेसवेल १०-३-३४-०; मॅट हेन्री १२-३-४५-०; मार्क क्रेग १७-०-८१-०; केन विलियम्सन १-०-८-०.