मेलबोर्न : कर्णधार स्टीव्ह स्मिथ गुणवान असून, खेळाडू, प्रशिक्षक व निवडकर्त्यांसह त्याचा चांगला ताळमेळ आहे. अशा सर्वेत्कृष्ट खेळाच्या खांद्यावर संघाची धुरा असल्याने आॅसी क्रिकेटबाबत काळजी नसल्याचे सांगत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने कर्णधारावरील विश्वास व्यक्त केला. पाँटिंगचा आॅस्ट्रेलियाच्या हॉल आॅफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर त्याने आयोजित वार्तालापात आपल्या भावना व्यक्त केल्या. स्मिथची प्रशंसा करताना पाँटिंग म्हणाला, जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची क्षमता आहे.
स्मिथमुळे चिंता नाही - पाँटिंग
By admin | Updated: October 23, 2015 01:33 IST