नवी दिल्ली : इंचियोन आशियाडमध्ये भारतीय मल्ल किमान सहा पदके जिंकून देतील, असा विश्वास ऑलिम्पिक कांस्य विजेता मल्ल योगेश्वर दत्त याने व्यक्त केला आहे. मी स्वत: सुवर्ण जिंकण्याबद्दल आशावादी असल्याचेही तो म्हणाला. 31 वर्षाचा योगेश्वर म्हणाला, ‘ मी 2क्क्6 मध्ये आशियाडचे कांस्य जिंकले, तर 2क्1क् मध्ये खेळू शकलो नव्हतो. येथे सुवर्णपदक जिंकणो ‘टार्गेट’ आहे. कुस्तीत आम्ही दोन सुवर्णासह किमान सहा पदके जिंकण्याबद्दल आश्वस्त आहोत. आशियाडसारख्या मोठय़ा स्पर्धेत शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक कणखरता महत्त्वाची असते. काही सेकंदांत निर्णय घेत ते अमलात आणावे लागतात. कुस्तीचा खेळ शारीरिक प्रदर्शनापलीकडचा आहे.’ प्रतिस्पर्धी मल्लांना पायाच्या कैचीत पकडण्यात तरबेज असलेला योगेश्वर याने स्वत:चा पसंतीचा डाव ‘फतले’च्या बळावर लंडनमध्ये कांस्य जिंकले होते. ही लढत 1-1 ने बरोबरीत राहिल्यानंतर उत्तर कोरियाच्या री जोंग योंग याला पायाच्या कैचीत दाबले आणि सहा गुण पटकावले होते. योगेश्वर इंचियोनमध्येही ‘फितले’ हाच डाव टाकणार आहे. तो म्हणतो, ‘हा डाव माङया पसंतीचा आहे. करियरच्या सुरुवातीला मी हा डाव शिकलो आणि त्यावर मेहनत घेतली. या डावामुळे माङया गावातील प्रत्येकजण आनंदी होतो. ऑलिम्पिक पाठोपाठ आशियाडमध्येही हा डाव पदक मिळवून देईल, अशी खात्री आहे.’ तो पुढे म्हणाला, ‘कुठलाही मल्ल केवळ एका डावाच्या भरवशावर रिंगणात उतरत नसतो. आणखीही डाव त्याला अवगत असावेत. त्यासाठी दिवसांतील सहा तास सराव करावा लागतो. ‘गट्टा’, ‘अॅन्कल’ लॉक या डावांच्या बळावर आपण प्रतिस्पर्धी मल्लांना लोळवू शकतो.’
योगेश्वरने आशियाडच्या तयारीसाठी याच महिन्यात ताश्कंद येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला नव्हता. यावर तो म्हणाला, ‘दोन स्पर्धादरम्यान दहा दिवसांचा अवधी होता. कुठलीही जखम होऊ नये आणि आशियाडची मोहीम खंडित होऊ नये यासाठी मी निर्णय घेतला. विश्व चॅम्पियनशिप दरवर्षी होतच राहते; पण आशियाड चार वर्षातून एकदाच होत असल्यामुळे प्राधान्य देण्याचा निर्णय माङयासाठी कठीण नव्हता.’(वृत्तसंस्था)
आशियाडमध्ये आज भारत
4बॅडमिंटन : भारतविरुद्ध मकाऊ(महिला), भारतविरुद्ध कोरिया (पुरुष), अश्वारोहण : सांघिक स्पर्धा(राजेंद्र, नाडिया हजरदास, वनिता मल्होत्र आणि श्रुती व्होरा)
4ज्युडो : पुरुष : 6क् किलो सुशीला देवी, 52 किलो कल्पना देवी.
4नौकायान : लाईटवेट एकेरी स्कल : डी. दुष्यंत.
4नेमबाजी : 1क् मीटर एअर रायफल महिला: श्वेता चौधरी, हिना सिद्धू, हम. गोयल. 1क् मीटर एअर पिस्तुल सांघिक अंतिम फेरी. पुरुष ट्रॅप: मानशेरसिंग, डी. केनान, मानवजीत संधू. 5क् मीटर पिस्तुल पुरुष: ओमप्रकाश, जीतू राय, ओमकारसिंग. 5क् मीटर पिस्तुल सांघिक अंतिम फेरी: ओमप्रकाश, जीतू राय, ओमकारसिंग.
4स्क्वॅश : महिला एकेरी ज्योस्}ा चिनप्पा, दिपिका पालिक्कल. पुरुष एकेरी: हरिंदरपाल संधू.
4टेनिस : महिला दुसरा राऊंड भारत- ओमान.
4वुशू : पुरुष अंजूल नामदेव, नरेंद्र ग्रेवाल,बिमोलजितसिंग, महिला- युमनामदेवी, संध्याराणी देवी.