शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सहा गोल, पण लढत बरोबरीत, कॅमेरुन-सर्बियाचे एका गुणावर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 12:20 IST

कॅमेरुन-सर्बियाचे प्रत्येकी एका गुणावर समाधान

अल-वकराह (कतार) : फुटबॉल विश्वचषकाच्या ‘ग’ गटातील लढतीत कॅमेरुन आणि सर्बिया यांनी तब्बल सहा गोलचा वर्षाव केला. मात्र, यानंतरही सामना ३-३ असा बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघांना अखेर एका गुणावर समाधान मानावे लागले.

अल जेनौब स्टेडियममध्ये या सामन्यात अनेक नाट्ये घडली. सातत्याने सामन्याचे पारडे बदलत राहिल्याने दोन्ही संघांच्या पाठीराख्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कॅमेरुनने सामन्यात पहिला गोल करत आघाडी घेतल्यानंतर पहिल्या सत्रातील अखेरच्या दोन मिनिटांमध्ये सर्बियाने दोन गोल करत २-१ अशी आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच पुन्हा सर्बियाकडून गोल झाला. कॅमेरुननेही जोरदार प्रत्युत्तर देताना ६४ आणि ६६व्या मिनिटाला गोल करत सामना ३-३ असा बरोबरीत आणला. यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, अखेरपर्यंत कोणालाही गोल करता न आल्याने सामना बरोबरीत राहिला. कॅमेरुनकडून जीन-चार्ल्स कॅस्टेलेटो (२९वे मिनिट), विन्सेंटट अबुबाकर (६३वे मिनिट) आणि एरिक मॅक्सिम (६६वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. 

 विश्वचषक सामन्यात २ गोलने पिछाडीवर असताना पराभव टाळणारा कॅमेरुन पहिला आफ्रिकन देश ठरला. विश्वचषक सामन्यात २ गोलची आघाडी घेऊनही विजयापासून दूर राहण्याची सर्बियाची दुसरी वेळ. विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच सर्बियाने बरोबरीवर समाधान मानले. विन्सेंट अबुबाकर हा १९६६ नंतरचा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला आफ्रिकन बदली खेळाडू ठरला.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Footballफुटबॉल