शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

सिंधू, समीर यांना विजेतेपद

By admin | Updated: January 30, 2017 03:29 IST

रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि राष्ट्रीय चॅम्पियन समीर वर्मा यांनी नव्या वर्षाची शानदार सुरुवात करताना रविवारी येथे १,२०,००० डॉलर बक्षीस रकमेची सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन

लखनौ : रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि राष्ट्रीय चॅम्पियन समीर वर्मा यांनी नव्या वर्षाची शानदार सुरुवात करताना रविवारी येथे १,२०,००० डॉलर बक्षीस रकमेची सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, भारताने या स्पर्धेत वर्चस्व राखताना पाचपैकी तीन गटांत अजिंक्यपद आपल्या नावावर केले.गेल्या सत्रात शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या अव्वल मानांकित सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्काचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला, तर हाँगकाँग सुपर सिरीजच्या फायनलमध्ये धडक मारणाऱ्या समीरने आपल्याच देशाच्या साई प्रणीतचा ४४ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१९, २१-१६ असा पराभव केला.ब्राझील आणि रशियात ग्रांप्री विजेतेपद जिंकणाऱ्या प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या द्वितीय मानांकित जोडीनेदेखील मिश्र दुहेरीतील आपले पहिले ग्रांप्री गोल्डचे विजेतेपद पटकावले. या जोडीने अंतिम सामन्यात अश्विनी पोनप्पा आणि बी. सुमीत रेड्डीला सातव्या मानांकित जोडीला २२-२०, २१-१० असे नमवले. महिला एकेरीत सिंधूला आपले पहिले सय्यद मोदी विजेतेपद जिंकण्यासाठी मरिस्का हिचा ३० मिनिटे रंगलेल्या लढतीत जास्त कष्ट करावे लागले नाहीत. ती २०१४मध्ये जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन सायना नेहवालकडून पराभूत झाली होती. विद्यमान आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती आणि डेन्मार्कची अव्वल मानांकित कॅमिला रिटरल जुहल आणि क्रिस्टिना पेडरसन यांनी भारताची नवीन जोडी अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांना ३८ मिनिटांत २१-१६, २१-१८ असे पराभूत करीत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा अव्वल मानांकित माथियास बो आणि कर्स्टन मोगेनसेन या जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या जोडीने चिनी-तैपेईच्या लू चिंग याओ आणि यांगा पो हान या आठव्या मानांकित जोडीला एकतर्फी अंतिम फेरीत २१-१४, २१-१५ असे पराभूत केले.