शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या अभिमन्यू पुराणिकला रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 02:41 IST

पुण्यातील सर्वांत तरूण ग्रॅण्डमास्टर अभिमन्यू पुराणिक याने आपल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले

पुणे : पुण्यातील सर्वांत तरूण ग्रॅण्डमास्टर अभिमन्यू पुराणिक याने आपल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळविताना जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत शनिवारी रौप्यपदकाची कमाई केली.टर्की येथे ही स्पर्धा झाली. ११ फेरींच्या या स्पर्धेत इराणचा ग्रॅण्डमास्टर पारहम मॅगसॉद्लो याने ९.५ गुणांसह सुपर्णपदक पटकावले. अभिमन्यूला ८.५ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिमन्यूने अखेरच्या फेरीत ग्रॅण्डमास्टर अराम हाकोबयान याच्यावर मात केली. रशियाचा इंटरनॅशनल मास्टर सर्गेई लोबानोव कांस्यपदकाचा मानकरी ठरला.स्पर्धेच्या प्रारंभी काहीसा चाचपडत खेळ करणाऱ्या अभिमन्यूला पहिल्या ५ फेरींमध्ये ३.५ गुणांचीच कमाई करता आली. नंतर मात्र त्याने आपला खेळ कमालीचा उंचावला. अखेरच्या ६ फेरींमध्ये त्याने जोरदार मुसंडी मारताना ५ गुण मिळविले. या स्पर्धेत त्याने ७ विजय, ३ बरोबरी आणि १ पराभव अशी कामगिरी केली. या स्पर्धेत अभिमन्यूला २३वे मानांकन देण्यात आले होते.१८ वर्षीय अभिमन्यू सिम्बायोसिस महाविद्यालयात बी. कॉमच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. ‘फिडे’चे मान्यताप्राप्त प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली तो २००७ पासून सराव करीत आहे.

टॅग्स :Chessबुद्धीबळ