शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टोकिओ ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 01:50 IST

टोकिओ ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम !

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना उद्देशून ही ऑनलाइन याचिका राबविण्यात येत आहे. बाक हे या महिन्याअखेर जपानच्या भेटीवर येणार आहेत.

टोकिओ : अख्खे विश्व कोरोनाच्या दहशतीखाली असल्यामुळे आगामी २३ जुलैपासून जपानमध्ये आयोजित टोकिओ ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही दिवआंआधी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेवर हजारो लोकांनी स्वाक्षरी करीत पाठिंबा दर्शविला.टोकिओ, ओसाका आणि अन्य काही शहरांत कोरोनामुळे ११ मेपर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मागच्या वर्षी वाढत्या कोरोनामुळे ऑलिम्पिक लांबणीवर टाकण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना उद्देशून ही ऑनलाइन याचिका राबविण्यात येत आहे. बाक हे या महिन्याअखेर जपानच्या भेटीवर येणार आहेत. १७ मे रोजी हिरोशिमा येथे ऑलिम्पिक रिलेचा प्रवास पूर्ण होत असून त्यानिमित्त आयोजित सोहळ्याला ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते टोकिओला भेट देतील. या शहरात ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी अनेक गटांनी निदर्शने करण्याची योजना आखली आहे. टोकिओच्या गर्व्हनरपदासाठी अनेकदा निवडणूक लढविणारे केंजी उत्सुनोमिया यांनी ही विरोध मोहीम राबविली असून मोहीम सुरू होताच पहिल्या २४ तासांत जवळपास ५० हजार लोकांनी स्वाक्षरी केली. 

उत्सेनोमिया म्हणाले, ‘कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांकडे डोळेझाक करीत सरकार ऑलिम्पिक डोळ्यापुढे ठेवून योजना तयार करीत आहे. सरकारच्या या धोरणाला आमचा विरोध आहे. इस्पितळात जागा नसल्यामुळे लोक घरातच प्राण सोडत आहेत. देशातील नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी ऑलिम्पिकचे आयोजन सरकारसाठी महत्त्वाचे झाले आहे काय? 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या