अमरावती : थायलंडमध्ये नुकत्याच झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत अमरावती येथील हव्याप्र मंडळातील शारीरिक महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम इंगळे याला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.थायलंडमधील पटेला येथे २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान किक बॉक्सिंग स्पर्धा सुरू आहे. यामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळद्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमधील बी.ए. योगा कोर्समधील तृतीय वर्षाला शिकत असलेला विद्यार्थी शुभम इंगळे याने किक बॉक्सिंगमध्ये नैपुण्य प्राप्त करून अमरावती जिल्ह्यातील मान उंचावली आहे.
शुभम इंगळेला थायलंडमध्ये सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 17:41 IST