शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

श्री माँ संघाची दमदार आगेकूच

By admin | Updated: May 6, 2015 02:37 IST

मुंबई: श्री माँ विद्यालय आणि यजमान सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या संघांनी आपआपल्या सामन्यात सहज बाजी मारताना सिंघानिया चषक आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच कायम राखली.

मुंबई: श्री माँ विद्यालय आणि यजमान सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या संघांनी आपआपल्या सामन्यात सहज बाजी मारताना सिंघानिया चषक आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच कायम राखली.अत्यंत एक्तर्फी झालेल्या सामन्यात श्री माँ संघाने एकहाती वर्चस्व राखताना नालंदा स्कूलचा तब्बल २२२ धावांनी चुराडा केला. नाणेफेक जिंकून श्री माँ संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन निर्धारीत ३० षटकांत ७ बाद २६८ धावांचा एव्हरेस्ट उभारला. निर्मय देवरुखकरने आक्रमक १२१ धावांची शतकी खेळी करुन नालंदाची गोलंदाजी फोडून काढली. आयुष पुजारीने निर्णायक क्षणी आक्रमक २४ धावा फटकावल्या. नालंदाकडून अमोघ एम याने एकट्याने नियंत्रित मारा करतअआ ४९ धावांत ३ बळी घेत श्री माँ संघाला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला.यानंतर फलंदाजीला उतरलेल्या नालंदा संघाला श्री माँ संघाचे भलेमोठे आव्हान सुरुवातीपासूनच पेलवले नाही. आयुष मोगलने शानदार हॅट्ट्रीक नोंदवताना २५ धावांत ५ बळी घेत नालंदाच्या आव्हानातली हवाच काढली. धर्मेश मणियारने (२/११) देखील अचूक मारा करीत आयुषला चांगली साथ दिली. या दोघांच्या जोरावर श्री माँ संघाने नालंदाला केवळ ४६ धावांत गुंडाळून दणदणीत विजय नोंदवला.अन्य एका सामन्यात सहज विजय मिळवताना बलाढ्य सुलोचनादेवी सिंघानिया संघाने सरस्वती स्कूलचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. मिहिर किनारेने फटकावलेल्या ९६ धावांच्या जोरावर सरस्वती संघाने सिंघानियासमोर ३० षटकांत ५ बाद २०९ अशी भक्कम मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करतान विराज गोसावी (८२), क्षितीज बिसवास (६४) आणि प्रीथ्वीक पंडित (नाबाद २२) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर सिंघानिया संघाने ३ फलंदाजांच्या मोबदल्यात २७.१ षटकांत विजयी लक्ष गाठले. विराजने ६० चेंडूत ८२ धावांचा तडाखा देत सामनावीराचा मान मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)