शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयशने दिला द्विशतकी तडाखा

By admin | Updated: February 20, 2017 00:40 IST

मुंबईकर श्रेयश अय्यरने आॅस्टे्रलियन गोलंदाजी फोडून काढताना तीनदिवसीय सराव सामन्यात तडाखेबंद नाबाद द्विशतक झळकावले.

मुंबई : मुंबईकर श्रेयश अय्यरने आॅस्टे्रलियन गोलंदाजी फोडून काढताना तीनदिवसीय सराव सामन्यात तडाखेबंद नाबाद द्विशतक झळकावले. श्रेयशच्या फटकेबाजीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने आॅस्टे्रलियाविरुध्द पहिल्या डावात सर्वबाद ४०३ धावांची मजल मारली, तर आॅस्टे्रलियाने ६६ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ४ बाद ११० धावा केल्यानंतर सामना अनिर्णित सोडविण्याचा निर्णय घेतला. आॅस्टे्रलियाच्या पहिल्या डावातील ४६९ धावांचा पाठलाग करतना श्रेयशने खंबिरपणे उभे राहत कांगारुंची बेदम पिटाई केली. श्रेयशने सुरुवातीपासून ‘वन डे’ स्टाइलने फलंदाजी करताना २१० चेंडूत नाबाद २०२ धावांचा तडाखा दिला. त्याने २७ चौकार आणि ७ गगनभेदी षटकार ठोकत आपली खेळी सजवली. रविवारी सकाळी श्रेयशने वैयक्तिक ८५ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केल्यानंतर जॅक्सन बर्डला सलग तीन चौकार खेचून आपले नववे प्रथम श्रेणी शतक पुर्ण केली. तसेच, वैयक्तिक १८४ धावांवर असतानाही श्रेयशने ओकीफीला ३ चौकार ठोकत द्विशतक पुर्ण केले. श्रेयशने आठव्या क्रमांकावरील क्रिष्णप्पा गौतमसह सातव्या विकेटसाठी १३८ धावांची मजबूत भागीदारी केली. रिषभ पंत (२१) व इशान किशन (४) दिवसाच्या सुरुवातीला झटपट परतल्यानंतर भारत ‘अ’ संघ अडचणीत आला. परंतु, गौतमने श्रेयशला उपयुक्त साथ दिली. सुरुवातीला अडखळणाऱ्या गौतमने खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर आॅसी आक्रमणाचा चांगलाच समाचार घेतला. श्रेयश - गौतम आॅसीवर भारी पडत असल्याचे दिसत असल्याने भारत ‘अ’ आघाडी घेणार असेच चित्र होते. परंतु, ओकीफीने गौतमची ‘बॅट’ शांत करताना ही जोडी फोडली.गौतमने ६८ चेंडूत १० चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांसह ७४ धावा काढल्या. गौतम बाद झाल्यानंतर ओकीफी आणि लियॉन यांनी उर्वरीत फलंदाजांना झटपट बाद करुन भारत ‘अ’चा डाव ४०३ धावांत गुंडाळला. लियॉन आणि ओकीफे या फिरकी जोडीने अनुक्रमे ४ व ३ बळी घेतले असले, तरी दोघांनीही शतकी धावांची खैरात केली. यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात करताना आॅस्टे्रलियाने ४ बाद ११० धावांची मजल मारली. सलामीवीर मॅट्ट रेनशॉ (१०) आणि बढती मिळालेला ग्लेन मॅक्सवेल (१) यांना झटपट बाद करुन भारतीयांनी कांगारुंची २ बाद ३२ अशी अवस्था केली. यानंतर डेव्हीड वॉर्नरही (३५) अशोक दिंडाचा शिकार ठरल्याने आॅसी ३ बाद ५९ असे कोंडित सापडले. परंतु, ओकीफे (नाबाद १९) आणि पीटर हँड्सकॉम्ब (३७) यांनी ४२ धावांची भागीदारी करुन संघाला सावरले. हँड्सकॉम्ब परतल्यानंतर आॅस्टे्रलियाने भारतीय कर्णधाराच्या संमतीने सामना अनिर्णित राखला. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलकआॅस्टे्रलिया (पहिला डाव) : १२७ षटकात ७ बाद ४६९ धावा.भारत ‘अ’ (पहिला डाव) : ४ बाद १७२ धावांवरुन पुढे... श्रेयश अय्यर नाबाद २०२, रिषभ पंत झे. व गो. ओकीफे २१, इशान किशन झे. वेड गो. मिशेल मार्श ४, क्रिष्णप्पा गौतम त्रि. गो. ओकीफे ७४, शाहबाज नदीम पायचीत गो. ओकीफी ०, अशोक दिंडा झे. हँड्सकॉम्ब गो. लियॉन २, नवदीप सैनी झे. स्मिथ गो. लियॉन ४. एकूण : ९१.५ षटकात सर्वबाद ४०३ धावा. गोलंदाजी : जॅक्सन बर्ड २०-८-६०-२; नॅथन लियॉन २८.५-३-१६२-४; स्टीव्ह ओकीफे २४-३-१०१-३; आॅस्टे्रलिया (दुसरा डाव) : डेव्हीड वॉर्नर झे. बाबा इंद्रजित गो. दिंडा ३५, मॅट रेनशॉ त्रि. गो. पंड्या १०, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. सैनी १, स्टीव्ह ओकीफे नाबाद १९, पीटर हँड्सकॉम्ब झे. गौतम गो. पंत ३७, मॅथ्यू वेड नाबाद ६. एकूण : ३६ षटकात ४ बाद ११० धावा. अवांतर - २. गोलंदाजी : हार्दिक पंड्या ५-१-३०-१; नवदीप सैनी ७-२-२०-१; अशोक दिंडा ७-२-१८-१; रिषभ पंत २-०-९-१; आॅस्टे्रलिया दौरा फायदेशीर ठरला : अय्यरमुंबई : भारत ‘अ’कडून खेळताना केलेला आॅस्टे्रलिया दौरा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. एक खेळाडू म्हणून या दौऱ्यात खूप शिकायला मिळाले आणि या दौऱ्याचा माझ्या कारकिर्दीमध्ये खूप फायदा झाला, असे आॅस्टे्रलियाविरुध्दच्या सराव सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या श्रेयश अय्यरने म्हटले. विराट कोहली अशा खेळाडूंपैकी आहे, की ज्यांना तुम्ही डिवचले तर त्या परिस्थितीमध्ये त्यांचा खेळ अधिक बहरतो आणि जर का तुम्ही अशा खेळाडूंच्या मागे हात धुऊन पडलात तर, त्यांचा खेळ याहूनही अधिक बहरतो. आम्हाला आमचा सर्वश्रेष्ठ खेळ करावा लागेल. मैदानावर आम्ही स्लेजिंगच्या निर्धाराने न उतरता खिलाडूवृत्तीने सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याच्या निर्धाराने आम्ही उतरु.- डेव्हीड वॉर्नर