शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरीचा सुयश पाटील ठरला नवोदित ‘मुंबई श्री’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:52 IST

अंधेरीच्या फॉर्च्युन फिटनेस संघाच्या सुयश पाटीलने अप्रतिम प्रदर्शन करताना नवोदित मुंबई श्री किताब पटकावला. तब्बल २२० युवा शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या मानाच्या स्पर्धेत विजेतेपदाची अटीतटीची लढत रंगली.

मुंबई : अंधेरीच्या फॉर्च्युन फिटनेस संघाच्या सुयश पाटीलने अप्रतिम प्रदर्शन करताना नवोदित मुंबई श्री किताब पटकावला. तब्बल २२० युवा शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या मानाच्या स्पर्धेत विजेतेपदाची अटीतटीची लढत रंगली. परळच्या हर्क्युलस जिमच्या समीर भिलारे याने ‘बेस्ट पोझर’चा मान मिळवला.बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने लालबाग येथील गणेशगल्लीमध्ये या स्पर्धेचा थरार पार पडला. एकूण ७ वजनी गटामध्ये झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटामध्ये ४०-४५ स्पर्धकांची लाभलेली उपस्थिती पाहता आणखी एक गट आयोजकांना वाढवावा लागला. प्रत्येक गटातून १५ शरीरसौष्ठवपटूंची निवड करण्यात आल्यानंतर त्यातून अव्वल ५ गटविजेत्यांची निवड करताना परिक्षकांना घाम फुटला. अनेक गटातील विजेता ठरविण्यासाठी परिक्षकांना कंपेरिझन करावी लागली.८० किलो वजनी गटातून सहभागी झालेल्या सुयशने गटविजेतेपद पटकावल्यानंतर अंतिम फेरीतही अप्रतिम कौशल्य सादर केले. यावेळी त्याला ८० किलोहून अधिक वजनी गटाचा विजेता नितीन रुपाले याच्याकडून तगडे आव्हान मिळाले. परंतु, सुयशने कोणतेही दडपण न घेता आपल्या पीळदार शरीरयष्टीचे शानदार प्रदर्शन करताना प्रेक्षकांसह परिक्षकांचेही लक्ष वेधले.त्याचवेळी किशोर राऊत (५५ किलो), साजिद मलिक (६०), विनायक गोळेकर (६५), सुजीत महापत (७०), समीर भिलारे (७५) आणि नितील रुपाले (८०हून अधिक) यांनी आपआपल्या गटात जेतेपद पटकावताना छाप पाडली.गटनिहाय अव्वल तीन क्रमांक५५ किलो : १. किशोर राऊत(परब फिटनेस), २. अविनाश वणे (पॉवर अ‍ॅड), ३. ऋषिकेश परब (कृष्णा जिम), ६० किलो : १. साजिद मलिक (हार्डकोर), २. आकाश घोरपडे (स्लिमवेल), ३. तुषार गुजर (मातोश्री), ६५ किलो : १. विनायक गोळेकर (मातोश्री),२. चेतन खारवा (ग्रो मसल), ३. आदेश चिंचकर (आर.एम.भट),७० किलो : १. सुजीत महापत (लीना मोगरे), २. महेश पवार(पॉवर जिम), ३. आशिष लोखंडे (आर.एम.भट),७५ किलो : १. समीर भिलारे (हर्क्युलस जिम), २. अमोल जाधव (गुरूदत्त जिम), ३. कल्पेश मयेकर (परब फिटनेस),८० किलो : १. सुयश पाटील (फॉरच्युन फिटनेस), २. सिद्धीराज परब (रिगल जिम), ३. रोहन कांदळगावकर (फोकस फिटनेस),८० किलोवरील : १. नितीन रुपाले (परब फिटनेस), २. रविकांत पाष्टे (हर्क्युलस फिटनेस), ३. जावेद सय्यद (एम.जी.फिटनेस)

टॅग्स :Sportsक्रीडा