शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाज अंकुर मित्तलने जिंकले सुवर्ण, सांघिक प्रकारात कांस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 13:31 IST

हरयाणाचा नेमबाज अंकुर मित्तलने भारताला जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले.

चँगवॉन- हरयाणाचा नेमबाज अंकुर मित्तलने भारताला जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. हा ऑलिम्पिक इव्हेंट नसल्यामुळे अंकुरला 2020चा ऑलिम्पिक कोटा मिळाला नाही. याच गटात भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 26 वर्षीय अंकुरने शुटऑफमध्ये चीनच्या यियांग यांगचा पराभव केला. 75 फेऱ्यानंतर अंकुर आणि यियांग यांचे गुण 140 असे समसमान झाले होते. अंकुरने पाचव्या फेरीत पैकीच्या पैकी 30 गुणांची कमाई करताना स्वतःला सुवर्णपदकाच्या शर्यतीत कायम राखले. तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्लोव्हाकियाच्या हुबर्ट आंद्रेज ओलेंनिकनेही 140 गुणांची कमाई केली होती. त्यामुळे शुटऑफमध्ये अंकुरने चार लक्ष्य अचूक साधत सुवर्णपदक जिंकले. यियांगला तीन, तर ओलेंनिकला एकच लक्ष्य साधता आला आणि त्यामुळे त्यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सांघिक गटात भारताला 409 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघात अंकुरसह असाब मोहम्मद, शार्दूल विहान यांचा समावेश होता. सांघिक गटात इटली ( 411) आणि चीन ( 410) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. 

 

टॅग्स :Shootingगोळीबार