शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

शिखर धवनची शतकी खेळी

By admin | Updated: September 28, 2015 01:41 IST

कर्णधार व सलामीवीर शिखर धवनने (नाबाद ११६) शतकी खेळी करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी फिट असल्याचे सिद्ध केले. शिखरच्या शतकी

बेंगळुरू : कर्णधार व सलामीवीर शिखर धवनने (नाबाद ११६) शतकी खेळी करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी फिट असल्याचे सिद्ध केले. शिखरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्ध एकमेव अनधिकृत कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी रविवारी १ बाद १६१ धावांची मजल मारली. बांगलादेश ‘अ’ संघाचा पहिला डाव २२८ धावांत गुंडाळणाऱ्या भारत ‘अ’ संघाने प्रत्युत्तरात खेळताना शानदार सुरुवात करीत सामन्यावर पकड मजबूत केली. भारत ‘अ’ संघाला पाहुण्या संघाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी ६७ धावांची गरज असून ७ विकेट शिल्लक आहेत. त्याआधी वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोन (४-४५) व आॅफ स्पिनर जयंत यादव (४-२८) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने बांगलादेश ‘अ’ संघाचा डाव ५२.४ षटकांत २२८ धावांत गुंडाळला. शिखरने श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला उर्वरित दोन कसोटी सामन्यांतून माघारी घ्यावी लागली. यापूर्वी बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यातही त्याने शतक झळकावले होते. दुखापतीतून सावरल्यानंतर शिखर धवनने पुनरागमन करताना शानदार शतकी खेळी केली. शिखरने शतकांची हॅट््ट्रिक नोंदवली. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणाऱ्या शिखरने ११२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ११६ धावा फटकावल्या. त्यात १६ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. शिखरने अभिनव मुकुंदसोबत (३४) सलामीला १५३ धावांची भागीदारी केली. मुकुंदने ७८ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार लगावले. शिखरचा हा ९८ वा प्रथम श्रेणी सामना आहे तर मुकंद ९९ व्या प्रथम श्रेणी सामन्यात खेळत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या बांगलादेश ‘अ’ संघातील एकाही गोलंदाजांना भारत ‘अ’ संघाच्या सलामीच्या जोडीवर छाप सोडता आली नाही. शिखरने आक्रमक पवित्रा स्वीकारताना चौफेर फटकेबाजी केली आणि कारकीर्दीतील २१ वे प्रथम श्रेणी शतक झळकावले. शिखरच्या तुलनेत मुकुंदने संयमी फलंदाजी करीत कर्णधाराला योग्य साथ दिली. भारतीय संघाने जवळजवळ प्रति षटक पाचच्या सरासरीने धावा वसूल केल्या. सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण ३८९ धावा फटकावल्या गेल्या. आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी शतकवीर धवनला श्रेयस अय्यर (६) साथ देत होता. त्याआधी,चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या लढतीत बांगलादेशतर्फे शब्बीर रहमानने (नाबाद १२२) शतकी खेळी करीत भारतीय माऱ्याला समर्थपणे तोंड दिले. त्याला शुवागता होम (६२) आणि नासिर हुसेन (३२) यांची योग्य साथ लाभली.(वृत्तसंस्था)