नवी दिल्ली : बीसीसीआयने गुरुवारी अधिकृतपणे गुडघेदुखीमुळे त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज मोहंमद शमी आयपीएल आठमधून बाद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.आयपीएलच्या एका निवेदनानुसार शमीला गेल्या महिन्यात वर्ल्डकपदरम्यान दुखापत झाली होती. आयपीएलच्या तांत्रिक समितीने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात मोहंमद शमीच्या जागेवर दुसऱ्या कोणाला निवडण्यास मान्यता दिली आहे. शमी गुडघेदुखीमुळे आयपीएलमधून ‘आऊट’ झाला आहे.आयपीएलच्या तांत्रिक समितीत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, सौरव दासगुप्ता, सुबीर गांगुली, सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांचा समावेश आहे. वर्ल्डकपमध्ये १८ बळी घेणाऱ्या शमीने संयुक्त अरब अमिरातीविरुद्धचा सामना खेळला नव्हता. त्याला त्या वेळी त्याच्या गुडघ्याला विश्रांतीची गरज होती. सामन्यासाठी तंदुरुस्त राहणे आवश्यक असल्यामुळे नेटवरदेखील तो निवडक सराव सत्रात सहभागी होत होता. (वृत्तसंस्था)
शमी आयपीएलमधून बाद
By admin | Updated: April 24, 2015 09:30 IST