मुंबई पोलिसांकडून शाहरुखला क्लीन चिटमुंबई : २०१२ आयपीएलदरम्यान वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून वादामध्ये अडकलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मुंबई पोलिसांकडून त्याप्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नसल्याचे सांगून पोलिसांनी शाहरुखला क्लीन चिट दिली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची माहिती महानगर दंडाधिकारी न्यायालयातही दिली आहे, की आयपीएल सामन्यादरम्यान शाहरुखविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. कोलकाता नाइटरायडर्सचा (केकेआर) सहमालक असलेला शाहरुख खान आणि वानखेडेवरील सुरक्षारक्षक यांच्यामध्ये मोठी बाचाबाची झाली होती. या घटनेनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) शाहरुखवर ५ वर्षांची प्रवेशबंदी घातली होती. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच ही बंदी उठविण्यात आली आहे.नुकत्याच पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे, की ‘वानखेडे स्टेडियम प्रकरणाची तपासणी केल्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचे पुरावे मिळाले नाहीत.’ २०१२मध्ये झालेल्या या प्रकरणानंतर एका स्थानिक कार्यकर्त्याने शाहरुखविरुद्ध सुरक्षारक्षकाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी न्यायालयात तक्रार केली होती. त्याचबरोबर, पोलिसांनी संगितले, की त्यांनी याप्रकरणी अभिनेता शाहरुख याची प्रतिक्रियाही घेतली असून, त्याने त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. (वृत्तसंस्था)
मुंबई पोलिसांकडून शाहरुखला क्लीन चिट
By admin | Updated: October 6, 2016 04:51 IST