शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया पराभवाच्या छायेत

By admin | Updated: July 31, 2015 00:48 IST

पहिल्या डावात १४५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेणाऱ्या इंग्लंडने स्टीव्हन फिनच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात विजयाकडे कूच केली आहे.

बर्मिंगहॅम : पहिल्या डावात १४५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेणाऱ्या इंग्लंडने स्टीव्हन फिनच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात विजयाकडे कूच केली आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आॅस्ट्रेलियाची ७ बाद १६८ अशी दयनीय स्थिती झाली होती. त्यांच्याकडे फक्त २३ धावांची आघाडी असून त्यांचे केवळ ३ फलंदाज बाकी आहेत. आज खेळ थांबला तेव्हा पीटर नेव्हील ३७ आणि मिशेल स्टार्क ७ धावांवर खेळत होते. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या आॅस्ट्रेलियाची फलंदाजीची फळी स्टीव्हन स्मिथच्या धारदार गोलंदाजीसमोर सपशेल ढेपाळली. त्यांच्याकडून फक्त डेव्हिड वॉर्नरने ६२ चेंडूंत ११ चौकारांसह ७७ आणि नेव्हीलने ३ चौकारांसह ३७ धावा काढताना एकाकी झुंज दिली. इंग्लंडकडून स्टीव्हन फिन याने ४५ धावांत ५ गडी बाद केले. त्याला अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली.त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात ६७.१ षटकांत सर्व बाद २८१ धावा केल्या. त्यांच्यातर्फे जो रुट याने सर्वाधिक ७५ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह ६३, मोईन अलीने ७८ चेंडूंत ११ चौकारांसह ५९, इयान बेलने ५३ आणि स्टुअर्ट ब्रॉडने ५५ चेंडूंत ३ चौकारांसह ३१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. आॅस्ट्रेलियाकडून हेजलवूड आणि नाथन लियोन यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे ७४ व ३६ धावा मोजल्या. त्यांना मिशेल स्टार्क आणि मिशेल जॉन्सन यांनी प्रत्येकी २ बळी घेत साथ दिली. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ आता १-१ अशा बरोबरीत आहेत. इंग्लंडने आज ३ बाद १३३ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. जॉनी बेयरस्टॉने जोश हेजलवूडच्या चेंडूवर चौकार मारत इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली; परंतु मिशेल जॉन्सनने त्याच्या तीन चेंडूंच्या आत दोन गडी बाद करीत आॅस्ट्रेलियाला मुसंडी मारून देण्यात यश मिळविले. बेयरस्टॉ फक्त ५ धावा काढून जॉन्सनच्या चेंडूवर यष्टिरक्षक पीटर नेविलच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. हा जॉन्सनचा ३00 वा बळीदेखील होता. दोनच चेंडूंनंतर त्याने बेन स्टोक्स यालादेखील यष्टिपाठीमागे झेलबाद केले. त्यामुळे इंग्लंडची स्थिती ५ बाद १४२ अशी झाली.कार्डिफ येथे पहिल्या कसोटीत शतक ठोकणाऱ्या रुटने एका बाजूने झुंज दिली. तथापि, त्याने त्याच्याच चुकीने विकेट गमावली. रुटने मिशेल स्टार्कच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात स्लीपमध्ये अ‍ॅडम वोजेसच्या हाती झेल दिला. त्यानंतर लियोनने जोस बटलर (७) याला पायचीत केले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ७ बाद २२१ धावा केल्या होत्या. त्यानंतर मोईन अली आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी आठव्या गड्यासाठी १९.३ षटकांत ८७ धावांची भागीदारी करीत इंग्लंडची आघाडी वाढवली. आॅस्ट्रेलियाने ४ धावांच्या अंतरातच ३ फलंदाजांना गमावताना इंग्लंडची मोठी आघाडी घेण्याच्या आशेला तडा दिला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक आॅस्ट्रेलिया पहिला डाव : १३६. दुसरा डाव : ७ बाद १६८. (डेव्हिड वॉर्नर ५५ षटकात ७ बाद १६८. (डेव्हिड वॉर्नर ७७, नेव्हिल खेळत आहे ३७. फिन ५/४५, अँडरसन १/१५, ब्रॉड १/३६).इंग्लंड : पहिला डाव २८१. (जो रुट ६३, इयान बेल ५३, मोईन अली ५९, स्टुअर्ट ब्रॉड ३१. हेजलवूड ३/७४, लियोन ३/३६, स्टार्क २/७१, जॉन्सन २/६६)मिशेल जॉन्सनचे ३०० बळीमिशेल जॉन्सनने इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बेयरस्टाच्या रूपाने आपला ३00 वा बळी घेतला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील २८ वा आणि आॅस्ट्रेलियाचा पाचवा गोलंदाज आहे. आपला ६९ वा सामना खेळणाऱ्या जॉन्सनने २,000 धावा आणि ३00 बळी, अशी दुहेरी कामगिरी केली आहे. वॉर्ननंतर अशी कामगिरी करणारा तो आॅस्ट्रेलियाचा दुसरा क्रिकेटर आहे.स्टेनचे ४०० विकेटस् पुर्णआपल्या गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांवर दहशत निर्माण करणाऱ्या दोन तेजतर्रार गोलंदाज डेल स्टेन आणि मिशेल जॉन्सन यांनी आज आपल्या कारकीर्दीत वैशिष्ट्यपूर्ण विक्रम केला आहे. स्टेन कसोटी क्रिकेटमधील ४00 बळी घेणारा जगातील १३वा गोलंदाज बनला आहे, तर आॅस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सनचा ३00 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. स्टेनने बांग्लादेशविरुद्ध मीरपूर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी पहिल्या दिवशी तमीम इकबालच्या रूपाने त्याचा ४00 वा बळी घेतला. अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा तो दुसरा गोलंदाज ठरला. याआधी माजी कर्णधार शॉन पोलॉकने ४२१ गडी बाद केले आहेत.