शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सेरेनाचा संघर्षपूर्ण विजय; सोफियाचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:37 IST

तिसºया मानांकित सेरेनाने ग्रीसच्या १५ व्या मानांकित सकारीचा ६-३, ६-७(६), ६-३ ने पराभव केला.

न्यूयॉर्क : सेरेना विलियम्सने संघर्षपूर्ण खेळ करीत दोन आठवड्यांपूर्वी तिला पराभूत करणाऱ्या मारिया सकारीविरुद्ध निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत विजय मिळवला आणि सलग १२ व्यांदा यूएस ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.

तिसºया मानांकित सेरेनाने ग्रीसच्या १५ व्या मानांकित सकारीचा ६-३, ६-७(६), ६-३ ने पराभव केला. सकारीने वेस्टर्न अ‍ॅन्ड सदर्न ओपनमध्ये सेरेनाचा पराभव केला होता. सेरेनाने सामन्यादरम्यान स्वत:सोबत जोरजोरात बोलत स्वत:चा उत्साह वाढविला. याबाबत प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, ‘प्रेक्षक असले किंवा नसले तरी मी बरीच बोलत असते. माझ्यात पॅशन आहे. हे माझे काम आहे. असे बोलून मी स्वत:चा उत्साह वाढवित असते. मी कोर्टवर स्वत:ला झोकून देते.’ मुलाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी व्यावसायिक टेनिसमध्ये परतणारी ३२ वर्षीय पिरिनकोव्हाने एलिज कोर्नेटवर ६-४, ७-६(५), ६-३ ने विजय साकारला.

अमेरिकेची दुसरी मानांकित सोफिया केनिनला मात्र चौथ्या फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. बेल्जियमच्या १६ व्या मानांकित एलिस मर्टेन्सने तिला सरळ सेट््समध्ये ६-३, ६-३ ने पराभूत केले. या निकालामुळे के निनचे सलग दोन ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले.

रोहन बोपन्ना पराभूत

न्यूयॉर्क : रोहन बोपन्ना व कॅनडाचा त्याचा सहकारी डेनिस शापोवालोव यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. बोपन्ना-शापोवालोव यांना नेदरलँडच्या जीन ज्युलियन रोजर व रोमानियाच्या होरिया टेकाऊ जोडीविरुद्ध ५-७, ५-७ ने पराभव स्वीकारावा लागला.

टॅग्स :Tennisटेनिस