शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

सेरेना, नोव्हाकची विजयी सलामी

By admin | Updated: January 19, 2016 03:24 IST

जागतिक महिला टेनिस क्रमवारीतील अव्वल खेळाडू व गतविजेती सेरेना विलियम्स आणि नंबर वन पुरुष खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांनी

मेलबोर्न : जागतिक महिला टेनिस क्रमवारीतील अव्वल खेळाडू व गतविजेती सेरेना विलियम्स आणि नंबर वन पुरुष खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांनी या वर्षातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये जेतेपद राखण्याच्या दिशेने यशस्वी सुरुवात केली. सेरेना व नोव्हाक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत सोमवारी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. स्लोएन स्टिफन्स व सारा इराणी यांना मात्र पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पुरुष विभागात गतचॅम्पियन व अव्वल मानांकित जोकोवीचने सलामी लढतीत दक्षिण कोरियाच्या चुंग हियोनचा ६-३, ६-२, ६-४ ने सहज पराभव केला. मेलबोर्न पार्कमध्ये ३५ अंश तापमानात खेळताना सर्बियन खेळाडूने या लढतीत एकूण ४० विनर्स लगावले, तर चुंगला केवळ १६ विनर्स लगावता आले. पुरुष एकेरीतील अन्य महत्त्वाच्या सामन्यांमध्ये १४व्या मानांकित फ्रान्सच्या जाइल्स सिमोनने कॅनडाच्या वासेक पोसपिसिलचा ६-७, ६-३, ६-२, ६-४ ने, १२व्या मानांकित क्रोएशियाच्या मारिन सिलिचने हॉलंडच्या थिएमो डी बाकेरचा ६-७, ७-५, ६-२, ६-४ ने, १५व्या मानांकित बेल्जियमच्या डेव्हिड गोफेनने युक्रेनच्या सर्गेई स्टाकोवस्कीचा ३-६, ६-३, ६-४, ६-४ने, सातव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीने जर्मनीच्या फिलिप कोलश्रेबरचा ६-४, ६-३, ६-३ ने पराभव केला. २२व्या मानांकित क्रोेएशियाच्या इवो कोर्लोवीचने तिसऱ्या सेटनंतर सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे अर्जेंटिनाचा प्रतिस्पर्धी खेळाडू फेडरिको डेलबोनिसचा दुसऱ्या फेरीचा मार्ग मोकळा झाला. महिला विभागात पहिल्या फेरीत चौथे मानांकन प्राप्त पोलंडची अ‍ॅग्निस्का रदवांस्काने अमेरिकेच्या ख्रिस्टिना मॅकहेलचा ६-२, ६-३ने, तर सहाव्या मानांकिच चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्वितोव्हाने थायलंडच्या लुकसिका कुमकुमचा ६-३, ६-१ने, स्वित्झर्लंडच्या १२व्या मानांकित बेलिंडा बेनसिसने अमेरिकेच्या एलिसन रिस्केचा ६-४, ६-३ने आणि १३व्या मानांकित इटलीच्या रॉबर्टा विन्सीने आॅस्ट्रियाच्या तामिरा पास्जेकचा ६-४, ६-२ने पराभव केला. (वृत्तसंस्था)