शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
4
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
5
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
6
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
7
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
8
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
9
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
10
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
11
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
12
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
13
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
14
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
15
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
16
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
17
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
18
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
19
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
20
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे

फ्रेंच ओपनमध्ये सेरेना, नदालवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:01 IST

सेरेनाने पुनरागमनानंतर फक्त चार अधिकृत एकेरी सामने खेळले आहेत.

पॅरीस : आगामी फ्रेंच ओपनमध्ये सर्वांचे लक्ष महिला गटात सेरेना विलियम्स आणि पुरूष गटात राफेल नदाल यांच्यावर असेल. सेरेना विल्यम्स एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर ग्रॅण्ड स्लॅममध्ये खेळत आहे. २३ मेजर विजेतेपद पटकावणारी सेरेना २०१७ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर पहिल्यांदा मोठ्या स्पर्धेत सहभागी होत आहे.सेरेनाने पुनरागमनानंतर फक्त चार अधिकृत एकेरी सामने खेळले आहेत. तिने माद्रिद आणि रोममधील सराव सामन्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे जागतिक टेनिसवर वर्चस्व राखलेल्या सेरेनाला या अठवड्यात ४५३ वे मानांकन देण्यात आले आहे. फ्रेंच ओपनची गतविजेती येलेना ओस्टापेनाको हिने सेरेनाच्या पुनरागमनाविषयी सांगितले की,‘जर ती पुनरागमन करत आहे तर ते शानदार असेल.’ दुसरीकडे पुरुषांच्या गटात राफेल नदाल यंदा फ्रेंच ओपनचे विश्वविक्रमी ११वे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. पुरूषांच्या ड्रॉमध्ये सर्वांचे लक्ष त्याच्या कामगिरीवर असेल. व्यावसायिक टेनिसच्या काळात सहा पेक्षा जास्त फ्रेंच ओपनचे विजेतेपद अन्य कोणत्याही खेळाडूला पटकावता आलेले नाही. ‘किंग आॅफ क्ले’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या नदालला क्ले कोर्टवर पराभूत करणे कठीण आहे. (वृत्तसंस्था)2009 चा विजेता आणि नदालचा कट्टर प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर यंदाही या स्पर्धेत खेळणार नाही. विम्बल्डनपूर्वी पुरेपूर विश्रांती घेत पूर्णपणे तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. तसेच, २०१६ साली उपविजेता राहिलेला ग्रेट ब्रिटनचा अँडी मरेदेखील दुखापतीतून सावरत आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा