शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना, फेडररची १८व्या ग्रॅण्डस्लॅमकडे वाटचाल

By admin | Updated: August 28, 2014 01:50 IST

१८ व्या ग्रॅण्डस्लॅम किताबासाठी कोर्टवर उतरलेली सेरेना विलियम्स आणि रॉजर फेडरर यांनी आगेकूच केली आहे.

न्यूयॉर्क : १८ व्या ग्रॅण्डस्लॅम किताबासाठी कोर्टवर उतरलेली सेरेना विलियम्स आणि रॉजर फेडरर यांनी आगेकूच केली आहे. त्यांनी पहिल्या फेरीत सहज विजय साजरा केला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेनाने महिला एकेरीच्या लढतीत बिगरमानांकित टेलर टाऊनसेंडवर ६-१, ६-१ असा विजय साजरा केला, तर पुरुष एकेरीत स्वित्झर्लंडच्या फेडररने आॅस्ट्रेलियाच्या मारिंको मातोसेविकचा तीन सेटमध्ये चाललेल्या लढतीत ६-३, ६-४, ७-६ असा पराभव केला. या दोन्ही दिग्गजांनी जरी आपल्या कारकिर्दीत १७-१७ ग्रॅण्ड स्लॅम पटकावले असले तरी आजचा दिवस गाजवला तो वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवलेल्या अमेरिकेच्या १५ वर्षीय कॅथरीन बैलिस हिने. तिने १२व्या मानांकित स्लोवाकियाच्या डोमिनिका सिबुलकोवावर ६-१, ४-६, ६-४ असा विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. फेडररने पहिल्या फेरीत मिळवलेला हा विजय खूप खास होता. त्याचाा लहानपणीचा हिरो एनबीए स्टार मायकल जॉर्डन हि लढत पाहण्यासाठी उपस्थित होता. पाचवेळा अमेरिकन ओपन जिंकणाऱ्या फेडररसाठी पहिले दोन सेट सोपे गेले, परंतु तिसऱ्या सेटमध्ये मातोसेविकने त्याचा घामटा काढला. टायब्रेकरमध्ये मातोसेविकने हि लढत खेचली. त्यात फेडीने ७-४ असा विजय मिळवून आगेकूच केली. फेडररला पुढील फेरीत आॅस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथ याच्याशी मुकाबला करावा लागेल. त्याने स्पेनच्या एलबर्ट रामोस याला ६-३, ७-६, ६-३ असे पराभूत केले. इतर महत्वाच्या लढतीत स्पेनच्या डेवीड फेररने बोस्नियाच्या दामिर जुमूरचा ६-१, ६-२, २-६, ६-२ असा पराभव केला, तर १०व्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीने अमेरिकेच्या वायने ओडेनसिकवर ६-२, ६-४, ६-२ असा विजय मिळवला.महिला एकेरीत तिसरी मानांकित आणि २०११ची विम्बल्डन चॅम्पियन झेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोवा हिने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या क्रिस्टीना म्लोडेनोविकचा ६-१, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. वर्षांच्या तिन्ही ग्रॅण्ड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या २० वर्षीय इयुजिनी बुकार्डने बेलारुसच्या ओल्गा गोवोरसोवाचा ६-२, ६-१ ने पराभव केला. आठव्या मानांकित सर्बियाच्या एना इवानोविकने अमेरिकेच्या एलीसन रिस्केवर सरळ सेटमध्ये ६-३, ६-० असा विजय साजरा केला. ११व्या मानांकित इटलीच्या फ्लाविया पेनेटाने जर्मनीच्या जुलिआ जॉर्सिचा ६-३, ४-६, ६-१ असा आणि स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारो आॅस्ट्रेलियाच्या अजीला टामजानोविकचा ३-६, ६-२, ६-१ असा पराभव करून आगेकूच केली. मात्र माजी फ्रेंच ओपन चॅम्पियन रुसची स्वेत्लाना कुज्नेत्सोवाला पराभवाचे तोंड पहावे लागले. तिला न्युझीलंडच्या मारिना एराकोविकने ६-३, २-६, ६-७ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)