शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सेरेनाची चौथ्या फेरीत धडक, स्टिफन्सवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:41 IST

२२ वर्षांपूर्वी अमेरिकन ओपनमध्ये पदार्पणानंतर या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनावर लवकर बाहेर पडण्याचे संकट घोंघावत होते

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू सेरेना विलियम्सने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करताना माजी चॅम्पियन स्लोएन स्टिफन्सचा पराभव करीत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

२२ वर्षांपूर्वी अमेरिकन ओपनमध्ये पदार्पणानंतर या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनावर लवकर बाहेर पडण्याचे संकट घोंघावत होते, पण सहा वेळच्या या माजी चॅम्पियन खेळाडूने अंतिम १२ पैकी १० गेम जिंकत मायदेशातील सहकारी स्टिफन्सचा २-६, ६-२, ६-२ ने पराभव केला.शनिवारी सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये सेरेनाची तीन वर्षांची कन्या आॅलिम्पिया उपस्थित होती. मास्क घालून आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलेल्या आॅलिम्पियाने विजयानंतर आपल्या आईचे हात उंचावत अभिनंदन केले. सेरेनाही लॉकर रूमकडे परतताना आपल्या मुलीकडे बघून हात उंचावले.

पुढील फेरीत सेरेनाला यूनानच्या मारिया सकारीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मारियाने अमेरिकेच्या १९ वर्षीय अमांडा एनिसिमोव्हाचा ६-३, ६-१ ने पराभव केला. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना सेरेना म्हणाली, आशा आहे आॅलिम्पियाने आपल्या आईला आव्हान देताना बघितले असेल. आपल्या भेदक सर्व्हिससाठी ओळखल्या जाणाऱ्या सेरेनाने या लढतीत १२ एस लगावले.

सेरेनाविरुद्ध सातपैकी सहाव्या लढतीत पराभव स्वीकारणारी २०१७ची अमेरिकन ओपन चॅम्पियन स्टिफन्स म्हणाली, सेरेनाने शानदार सर्व्हिस केली. ती खरच या खेळातील सर्वात चांगल्या सर्व्हिस करणाºया खेळाडूंपैकी एक आहे. सेरेनावर एकवेळ पराभवाचे संकट होते. पण, तिने अखेरच्या १२ पैकी १० गेम्समध्ये बाजी मारत जोरदार पुनरागमन करीत बाजी मारली. अन्य लढतींमध्ये १६ व्या मानांकित एलिस मर्टेन्स, २० वे मानांकनप्राप्त कॅरोलिन मुकोवा व स्वेताना पिरोनकोव्ह यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत चौथी फेरी गाठली.स्वेतानाने धक्कादायक निकाल नोंदवताना १८ व्या मानांकित डोना वेकिचचा ६-४, ६-१ ने पराभव केला.पुरुष विभागात २०१९ चा उपविजेता डेनिल मेदवेदेव व सहावा मानांकित मातियो बेरेटनी यांनी विजय नोंदवला. (वृत्तसंस्था)

बोपन्ना-शापोवालोव्ह जोडी उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा अनुभवी खेळाडू रोहन बोपन्ना व त्याचा कॅनडाचा सहकारी डेनिस शापोवालोव्ह जोडीने सहाव्या मानांकित केव्हिन क्राविट््ज व आंद्रियास मिएस जोडीचा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करीत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.४भारत व कॅनडाची बिगरमानांकित जोडीने शनिवारी झालेल्या दुसºया फेरीच्या लढतीत पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करताना जर्मनच्या जोडीचा एक तास ४७ मिनिटांमध्ये ४-६, ६-४, ६-३ ने पराभव केला.४बोपन्ना-शापोवालोव्ह जोडीला उपांत्यपूर्व फेरीत जीन ज्युलियन रॉजर व होरिया तेकाऊ जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सुमित नागल व दिविज शरण स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर बोपन्ना स्पर्धेत एकमेव भारतीय खेळाडू शिल्लक आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Tennisटेनिस