शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

कोल्हापूरच्या प्रेरणाचा सनसनाटी विजय

By admin | Updated: July 12, 2016 21:44 IST

कोल्हापूरच्या प्रेरणा अल्वेकातने धडाकेबाज खेळ करताना नागपूरच्या अव्वल मानांकीत सई नंदुरकरला सरळ दोन गेममध्ये पराभूत करत दुसऱ्या महाराष्ट्र राज्य डॉ. विजय पाटील सब

राज्य बॅडमिंटन : अव्वलमानांकीत सईला नमवून उपांत्यपुर्व फेरीत धडक

मुंबई : कोल्हापूरच्या प्रेरणा अल्वेकातने धडाकेबाज खेळ करताना नागपूरच्या अव्वल मानांकीत सई नंदुरकरला सरळ दोन गेममध्ये पराभूत करत दुसऱ्या महाराष्ट्र राज्य डॉ. विजय पाटील सब - ज्युनिअर बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत मुलींच्या १५ वर्षांखालील गटाची उपांत्यपुर्व फेरी गाठली. दुसरीकडे मुलांमधून नागपूरच्या अग्रमानांकीत रोहान गुरबानी याने विजयी कूच केली.रायगड बॅडमिंटन संघटनेच्या वतीने नेरुळ येथील डॉ. डीवाय स्पोटर््स अ‍ॅकेडमीमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रेरणाने खळबळजनक निकाल लावताना विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या सईला २१-१८, २१-५ असे नमवले. पुण्याच्या जान्हवी कानिटकरने देखील विजयी आगेकूच करताना ॠषा दुबेला २१-१२, २१-१५ असे पराभूत केले. अन्य पुणेकर रुचा सावंतने विजयी घोडदौड कायम ठेवताना ठाण्याच्या उर्वी ठाकूरदेसाईला २१-१८, २३-२१ असा धक्का दिला. तर तनिष्का देशापांडे आणि अनन्या फडके या अन्य पुणेकरांनीही आपआपल्या सामन्यात बाजी मारत उपांत्यपुर्व फेरी गाठली.मुलांमध्ये नागपूरच्या रोहनने अपेक्षित कामगिरी करताना पुण्याच्या सस्मित पाटीलला २१-६, २१-१४ असे लोळवले. तर मुंबई उपनगरच्या सुशांत रव्वाला नागपूरच्या सिफत अरोराविरुद्ध २१-१६, १२-२१, २१-२३ अशी हार पत्करावी लागली. मुंबई उपनगरच्या चौथ्या मानांकीत तनिष्क सक्सेनाने आपल्या लौकिकानुसार विजय मिळवताना नाशिकच्या अदीप गुप्ताला २१-१४, २१-७ असे पराभूत केले. तर पुण्याच्या पार्थ घुबे याने आक्रमक खेळाच्या जोरावर रायगडच्या विश्वम पारिखचे आव्हान २१-११, २१-१३ असे संपुष्टात आणले. (क्रीडा प्रतिनिधी)............................................इतर निकाल :१५ वर्षांखालील :(मुली) : तनिष्का देशापांडे (पुणे) वि.वि. खुशी कुमारी २१-५, २१-११; रुद्रा राणे वि.वि. आदिती सधणकर २१-१०, २१-१२; सिध्दी जाधव (सातारा) वि.वि. साहन्या कुलकर्णी (पुणे) २१-७, २१-९; अनन्या फडके (पुणे) वि.वि. पूजा कचरे २१-१६, २२-२०; आर्या देशपांडे (सातारा) वि.वि. इरा उंबरजे (पुणे) २१-१४, २१-१७.(मुले) : अमेय खोंड (नाशिक) वि.वि. आयुष खांडेकर (पुणे) २१-१९, १०-२१, २१-१९; सुधांशू भुरे (नागपूर) वि.वि. वेदांत गोखले (पुणे) २१-१२, २१-११.१३ वर्षांखालील (मुले) : दर्शन पुजारी (पुणे) वि.वि. यश पवार (ठाणे) २१-६, २१-१३; स्कंद शानबाघ (नाशिक) वि.वि. आर्या ठाकोरे (पुणे) २१-१२, २१-१५; अथर्व जोशी (मुंबई उपनगर) वि.वि. सार्थक पाखमोडे (नागपूर) २१-७, २१-१४; आर्यन घोष (मु. उपनगर) वि.वि. सिध्दार्थ बावनकर (नागपूर) १५-२१, २१-१८, २४-२२; प्रथम वाणी (पुणे) वि.वि. आरव फर्नांडिस (नागपूर) २२-२०, २१-१७; प्रज्ज्वल सोनावणे (नाशिक) वि.वि. शुभक अहिरे (नाशिक) २१-१७, २१-१८; वर्धान ढोंंग्रे (पुणे) वि.वि. अरविंद्र राव (पुणे) १८-२१, २१-१७, २१-१९; तेजस शिंदे (सांगली) वि.वि. अदित एम. (ठाणे) २१-१३, २१-१२.