शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

खो-खो चा महान कार्यकर्ता हरपला; ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ रमेश वरळीकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 17:39 IST

ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ रमेश माधवराव वरळीकर यांची वयाच्या 83 व्या वर्षी माहीमच्या सुखदा नर्सिंग होममध्ये प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ रमेश माधवराव वरळीकर यांची वयाच्या 83 व्या वर्षी माहीमच्या सुखदा नर्सिंग होममध्ये प्राणज्योत मालवली. रमेश वरळीकर हे लहानपणापासूनच खो-खो खेळाच्या प्रेमात पडलेले होते. प्रभाकर वरळीकर यांनी सुरू केलेल्या लोकसेना या खो-खो संघाचे ते एक यशस्वी प्रशिक्षक होते. शिवाजी पार्कच्या स्काऊट पॅव्हेलियनच्या समोर त्यावेळी त्यांचा खो-खोचा सराव चालायचा. त्याकाळी त्यांचा मुलींचा संघ अतिशय बलवान असा होता. त्यांनी घडवलेल्या नामवंत राष्ट्रीय खो-खो खेळाडूंमध्ये डॉ. हेमा नेरवणकर, प्रतिभा गोखले,  रेखा राय तसेच बँक ऑफ इंडियाचा दिनेश परब हे सर्व त्यांनी घडवलेले खेळाडू होत. 1970 पर्यंत यांनी प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावली.

यादरम्यान रमेश वरळीकर हे मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे पदाधिकारी होते.  त्याकाळी पंच म्हणून रमेश वरळीकर यांनी भरपूर काम केले होते.  भाई नेरुरकर चषकात तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने पंच म्हणून यशस्वी कामगिरी वरळीकरसरांनी सांभाळली होती.  तसेच त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले होते. या सर्व प्रवासात वरळीकरसर स्पर्धेदरम्यान स्पर्धेची व खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची नोंद ठेवत असत. 1970 पासून त्यांनी खर्‍या अर्थाने संखीकीला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी खो-खोच्या नोंदणी चे पुस्तक छापले.  त्यांनी सांख्यिकीचे पुस्तक छापले तसेच खो-खो खेळा बद्दल सविस्तर पुस्तके सुध्दा आणली. अशाप्रकारे त्यांनी छोटी-मोठी चौदा पुस्तके लिहिलेली आहेत.  खो-खो चा इतिहास सांगताना त्यांनी मांडलेले अभ्यासपूर्ण मत आजही प्रमाण मानले जाते.

रमेश वरळीकरांच्या  आग्रहामुळेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मध्ये सांख्यिकीचा विभाग सुरू झाला. सुरुवातीला त्यांच्यासोबत एक संच असायचा त्यात अरूण देशपांडे, मनोहर साळवी अशी ज्येष्ठ मंडळी असत. त्यांची सांखिकी पध्दत व संच भारतीय स्तरावर सुध्दा कौतुकास पात्र ठरलेला होता.  एखाद्या सामन्यात एका संघाने एका डावात किती खो दिले व त्यांनी किती वेळा नियमोल्लंघन केले   इथपर्यंत सर्व नोंदी ते ठेवत असत.

रमेश वरळीकर म्हणजे खो-खोचा एक चालताबोलता इतिहासच  होता. कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केले की त्या-त्या प्रसंगी अभ्यासपूर्ण नोंदी समोरील खोखो प्रेमींसमोर समोर अलगद उलगडायचे. अनेक पंच वर्गांना त्यांचे मार्गदर्शन लाभलेले होते. अमरहिंद मंडळाचे ते माजी विश्वस्त.  महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे ते सुरुवातीला काही काळ पदाधिकारी होते. 2010 चाली त्यांनी राज्याचे प्रसिद्धी समितीचे प्रमुख पद सांभाळले होते. भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर मधून निवृत्तीनंतर त्यांनी खोची निस्सीम सेवा केली होती.

2010 साली वियोम फाऊंडेशन तर्फे जेव्हा मुंबईत शिवाजी पार्कवर राष्ट्रीय खो-खो स्पर्धा (मुंबईतील एकमेव राष्ट्रीय खो-खो स्पर्धा) आयोजित केली होती त्यावेळी मुंबईत राष्ट्रीय खो-खो स्पर्धा पाहण्याचे एक स्वप्न पूर्ण  झाल्याचे त्यांनी आवर्जून संगितले होते.  मुंबई खो-खो संघटनेतर्फे दिला जाणारा एकनाथ साटम ज्येष्ठ कार्यकर्ता खो-खो पुरस्काराचे ते पहिले मानकरी होते व हा पुरस्कार त्यांना 2010 साली त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संघटनेने दिला होता.

टॅग्स :Kho-Khoखो-खोMumbaiमुंबई