शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सुयशची पॅरालिम्पिकसाठी निवड

By admin | Updated: September 6, 2016 01:53 IST

अपंग जलतरणपटू सुयश नारायण जाधव याची ब्राझील येथे होणाऱ्या रिओ पॅरालिम्पिकच्या जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली

नासीर कबीर,

करमाळा- तालुक्यातील पांगरे येथील अपंग जलतरणपटू सुयश नारायण जाधव याची ब्राझील येथे होणाऱ्या रिओ पॅरालिम्पिकच्या जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.करमाळा तालुक्यातील पांगरे येथील अपंग जलतरणपटू सुयश जाधव (वय २२) याची पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत निवड झाल्याने तो जलतरण स्पर्धेत निवड झालेला जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला आहे. रशियात झालेल्या आयबॉज वर्ल्ड गेम्समध्ये सुयश जाधवने ५० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये सुवर्णपदक पटकावून त्याने रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत आपले स्थान पक्के केले. ७ ते १८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या १९ सदस्यांचे पथक रवाना झाले आहे. यामध्ये समावेश असलेला सुयश ५० मीटर बटरफ्लाय, ५० मीटर फ्री स्टाईल, २०० मीटर वैयक्तिक मिडले अशा तीन प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी व १२ सप्टेंबरला सायंकाळी ८ वाजता, १३ सप्टेंबरला ६ वाजून ३३ मिनिटांनी सुयश सहभागी असलेल्या स्पर्धा होणार आहेत.विजेच्या धक्क्याने अपघातलहानपणी विजेच्या धक्क्याने झालेल्या अपघातानंतर दोन्ही हात कोपरापासून कापावे लागल्याने अपंग बनलेल्या सुयशने वडील नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणात उल्लेखनीय कौशल्य दाखवत जलतरणातील एस. सेव्हन प्रकारात ५० मीटर बटरफ्लाय या शर्यतीचा जागतिक विक्रम आहे. चीनच्या पॅन शियून याने २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये ५० मीटर बटरफ्लाय शर्यत २९.४९ वेळेत पूर्ण केली होती. सुयशची यामधील सर्वोत्तम कामगिरी ३३.७३ अशी आहे. राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेतून सातत्याने पदकांची लयलूट करणारा सुयश आता पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.>पदक जिंकू... रिओ येथे होणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेतील सुवर्ण पदक आपण पटकावू, असा विश्वास सुयश जाधव याने व्यक्त केला. देशात व देशाबाहेर झालेल्या विविध स्पर्धेत आपण सातत्याने यश मिळवलेले आहे. त्यामुळे या सर्वाेच्च स्पर्धेत आपण आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करू.- सुयश जाधव