अहमदाबाद : किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग याने आयपीएलमध्ये काल झालेल्या चुरशीच्या लढतीतील राजस्थान रॉयल्सवरील विजयाचे श्रेय स्थानिक खेळाडू अक्षर पटेल आणि आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल जॉन्सन यांना दिले आहे.सुपर ओव्हरपर्यंत खेचल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानला पराभूत केल्यानंतर सेहवाग म्हणाला, ‘‘आमच्यासाठी ही एक चांगली लढत आहे. मिशेल जॉन्सनने फलंदाजी आणि गोलंदाजीही चांगली केली. विजयाचे श्रेय मिशेल आणि अक्षरला आहे. नशीबही आमच्या साथीला होते; परंतु आगामी लढतीत आम्ही नशिबावर अवलंबून राहण्याऐवजी चांगले क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करू. ग्लेन मॅक्सवेल गेल्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता; परंतु यंदा त्याचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे.’’
सेहवागने दिले अक्षर, जॉन्सनला विजयाचे श्रेय
By admin | Updated: April 23, 2015 02:43 IST